मुंबई - राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी वस्त्रसंहितेचा (ड्रेसकोड) नियम केला आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली असून ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? असा प्रश्न केला आहे.
राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी वस्त्रसंहितेचा (ड्रेसकोड) नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? असा प्रश्न रामदास आठवले यांनी ट्विट करून विचारला आहे. राज्य सरकारने मंत्रालयासह सर्व कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे आदेश काढले आहेत. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची वेगळी ओळख असावी, यासाठी ठराविक रंगाचा ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कार्यालयात हजर राहताना ड्रेसकोड सक्तीचा
राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना कोणत्या रंगाचा ड्रेस कोड असावा आणि तो कसा असावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार कर्मचाऱ्यांना यापुढे आपल्या कार्यालयात हजर राहताना ड्रेस कोड सक्तीचा होणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना यापुढे आपल्या कार्यालयात टी शर्ट जीन्स, गडद रंगाचे कपडे तसेच नक्षीकाम अथवा विविध प्रकारच्या डिझाईन असलेले कपडे वापरता येणार नाहीत. त्यामुळे येत्या काळात सरकारी कार्यालयातील कर्मचारी ठरवून दिलेल्या ड्रेस कोडमध्ये दिसणार आहेत.
या निर्णयावरच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रश्न विचारला असून रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? असे ते म्हणाले आहेत.