मुंबई- राज्यात कोरोना संक्रमण वाढत असून यावर उपाययोजना करण्यात येत आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करता यावे यासाठी राज्यातील पोलिसांच्या मदतीला 10 केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या तुकड्या राज्यात हजर झाल्या असून मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील या ठिकणी असणार कडक बंदोबस्त
झोन 1 मध्ये डोंगरी, नागपाडा, भेंडीबाजार या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) चे पथक तैनात करण्यात आले आहे. झोन 3 मध्ये शिवडी, लालबाग, परळ,आग्रीपाडा आणि झोन 9 वांद्रे, निर्मलनगर, वाकोला, बेहरामपाडा, परिसरात सीआयएसफ(CISF) च्या तुकड्या बंदोबस्तात आहेत.
झोन 5 मध्ये वरळी, धारावी, माहिम, कुर्ला या ठिकाणी आणि झोन 6 मध्ये चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर परिसरात CRPF च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या 10 तुकड्यात 5 रॅपिड एक्शन फोर्स , 3 सीआयएसएफ , 2 सीआरपीएफच्या कंपन्यांचा समावेश असून राज्यातील पोलिसांना विश्रांती मिळावी म्हणून या तुकड्या राज्यातील मुंबई , पुणे , औरंगाबाद, मालेगाव व अमरावती या सारख्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.