ETV Bharat / state

मोदी ब्लॅकमेलर; यामुळे प्रियांका गांधींनी घेतली वाराणसीतून माघार, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट - वीजपुरवठा

मुंबईतल्या कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे बहुजन वंचित आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील ६ लोकसभा उमेदवारांसाठी ही सभा होत आहे.

बहुजन वंचित आघाडीची मुंबईत सभा
author img

By

Published : Apr 26, 2019, 9:42 PM IST

Updated : Apr 26, 2019, 11:33 PM IST

मुंबई - मोदी ब्लॅकमेलर आहेत, असा आरोप करत प्रियांका गांधी यांनी नवऱ्याला वाचवण्यासाठी वाराणसीतून माघार घेतली असल्याचा गौप्यस्फोट बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

मुंबईतील ६ लोकसभा उमेदवारांसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत तोफ धडाडली. संपूर्ण मैदान भरले असून मैदान आणि मैदानाबाहेर एलईडी लावण्यात आले होते. सभा सुरु असताना ४ वेळा वीज पुरवठा खंडीत झाल्याने सभा रखडली होती.

आंबेडकर म्हणाले, सत्तेतल्या सरकारांनी शिक्षणाचा बाजार केला. आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही केजी टू पीजी मोफत शिक्षण देणार. लोकशाहीचा तमाशा आता थांबवायला हवा. आम्ही उमेदवारांची जाती जाहीर केल्यावर टिका झाली. विरोधक मात्र घराणेशाही करत आहेत. बारामतीची निवडणुक नात्या-नात्यात आहे. बहुजन वंचित आघाडी सामाजिक इतिहास घडवत आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, मोदींनी केवळ स्वप्न दाखवून फसवले. रॉबर्ट वढेराला जेलमध्ये का टाकले नाही यासंदर्भात मोदींनी सांगावे. तसेच ते सर्वात मोठे ब्लॅकमेलर आहेत. त्यांनी काँग्रेससोबत शिवसेनेला गुंडाळले आहे. तर प्रियांका गांधी यांनी राजकारण करून नवऱ्याला वाचवण्यासाठी वाराणसीतून माघार घेतली, असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना आहे. भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देऊन मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांचा अपमान केला आहे. करकरे, साळसकर, कामठेंनी प्राणाची आहुती देऊन पाकीस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे उघडा केला. शिवसेनेने साध्वीचा निषेध का केला नाही? हे उध्दव ठाकरेंनी सांगावे. मराठीचा जोगवा मागणाऱ्या शिवसेनेने प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या अपमानाबद्दल माफी मागितलीय का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. हिंदु दहशवाद नाकारणाऱ्या मुख्यमंत्री पदाची नशा चढू देऊ नका. शिवसेना शाखांमधून मराठी हुतात्म्यांचे फोटो काढणार का? ते सांगा असेही आंबेडकर म्हणाले.

एअर स्ट्राइकनंतर ३०० दहशतवादी मारले, असे मोदी सांगतात. पुलवामानंतर बीबीसीने प्रश्न विचारला तेव्हा मोदी खोटे बोलले. देश तोंडावर पडला. जगभरातील भारतीयांची मान खाली गेली. भारताच्या पंतप्रधानांना खाली खेचा. पुढचा कोण याचा विचार करू नका. माझे मुंबईतले ६ खासदार चांगला पंतप्रधान निवडून देतील. मुंबई दर २ वर्षांनी खोदली जाते. मुंबईत कंत्राटदाराचे राज्य आहे. ६ खासदार निवडून द्या. जनतेचे राज्य आणणार. लोकांच्या देणगीतून वंचित निवडणूक लढत आहे, असे आंबेडकर शेवटी म्हणाले.

Intro:Body:MH_BVA_MumbaiKurlaRally26.4.19

मुबई अलर्ट:

छत्रपती शिवाजी महाराज मैदान,नेहरू नगर कुर्ला (पुर्व) मुंबई येथे थोडयाच वेळात

वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महासभा सुरु होणार आहे..

मुंबईतील सहा लोकसभा उमेदवारांसाठी
ऍड प्रकाश आंबेडकर आणि बॅ.असदुद्दिन ओवैसी यांच्या उपस्थितीत तोफ धडाडणार आहे...
संपूर्ण मैदान भरले असून मैदान आणि मैदानाबाहेर एलईडी लावण्यात आले आहेत..Conclusion:
Last Updated : Apr 26, 2019, 11:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.