ETV Bharat / state

अशिलाची फसवणूक प्रकरणानं व्यवसायाची बदनामी, मुंबई उच्च न्यायालयानं वकिलाचा फेटाळला जामीन अर्ज - Mumbai High Court

वकिलान आशिलाची फसवणूक केल्यामुळं आरोपी वकिलाचा जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलाय. 2022 मध्ये मुंबईतील दहिसरमध्ये वकील हिरालाल जाधव यांनी त्यांच्या अशिलाची फसवणूक केली होती. या प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mumbai High Court
Mumbai High Court
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 8:37 AM IST

मुंबई : 2022 मध्ये मुंबईतील दहिसर येथे ऑक्टोबरमध्ये एका वकिलानं आपल्या अशिलाची सवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीला जामीन मिळवून देतो, असं खोटे आश्वासन देऊन वकिलानं एका महिलेची फसवणूक केली होती. त्यामुळं वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वकिलानं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल यांच्या न्यायालयानं 'वकिलानं खोटा व्यवहार केल्याचं' म्हणत त्यांचा अटकविरोधी जामीन अर्ज फेटाळला. यासंदर्भात उच्च न्यायालयानं 6 जानेवारी रोजी आदेश जारी केला आहे.

वकिलाची उच्च न्यायालयात धाव : ऑगस्ट 2022 मध्ये एका महिलेनं तिच्या पतीसंदर्भात वकिलाकडं जामिनासाठी प्रकरण दिलं होतं. त्यावेळी वकिलानं पतीला जामीन मिळवून देण्याचं अश्वासन दिलं होतं. त्यासाठी 65 हजार रुपये फीस लागेल, अशी मागणी वकिलानं केली होती. मात्र, पतीचा जामीन होत नसल्याचं महिलेच्या लक्षात आल्यानं तिनं वकिलाविरोधात दहिसह पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरनंतर संबंधित वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी वकिलानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी वकिलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. " वकिली व्यावसायाला शोभणारं वकिलाचं वर्तन दिसत नाहीय. त्यामुळं वकिलाचा जामीन अर्ज फेटाळून लावत आहे," असं न्यायालयानं आदेशात म्हटलंय.

  • पतीला जामीन मिळवून देतो : पीडित महिलेचा पतीवर 2021 मध्येच कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळं पतीला जामीन मिळण्यासाठी महिलेचा प्रयत्न सुरूच होता. त्यामुळं तिनं वकिलाशी याबाबत विचारणा चर्चा केली होती. तेव्हा, वकिलानं 'तुझ्या पतीला जामीन मिळवून देतो, असं म्हणत 65 हजार रुपये फी आकारली होती.

पतीला जामीन मिळाल्याची बतावणी : नवऱ्याला जामीन मिळाल्याचं वकिलाने महिलेला सांगितलं. त्यानंतर वकिलानं तिला 2023 मध्ये फोनवरून दिंडोशी कोर्टानं तुझ्या पतीला जामीन मंजूर केल्याचं सांगितलं होतं. मात्र, प्रत्यक्षात जामीन अर्ज मंजूर झाला नसल्याचं तिच्या लक्षात आलं. याबाबतची माहिती तिला ई-कोर्ट ऑनलाइनद्वारे मिळाली होती. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आल्यानं तिनं दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

वकिलाचा जामीन अर्ज फेटाळला : वकील हिरालाल जाधव यांनी पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. "वकिलानं न्यायालय तसंच कायदेशीर व्यवसायाची बदनामी केल्यामुळं जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळत असल्याचं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय.

हेही वाचा -

  1. अयोध्येत न जाता उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात करणार महाआरती, 'हे' सांगितलं कारण
  2. शरद मोहोळ हत्या प्रकरण : 'मी' मामासाठी हत्या करणार, आरोपीचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर
  3. "हे सरकार महाराष्ट्रविरोधी, सत्तेवर येताच घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.