मुंबई: हत्येचे कारण जवळपास स्पष्ट झाले असून त्या संदर्भात काही पुरावे गोळा केल्यानंतर ते कारण उघड केले जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे आरोपी मनोज साने याला असलेल्या दुर्धर आजाराबाबत कोणतीही वैद्यकीय तपासणी अद्याप करण्यात आलेली नसल्याचे देखील बजबुळे यांनी पुढे सांगितले.
हत्येचा उद्देश स्पष्ट करण्यात यश: हत्येचा नेमका उद्देश काय आहे, त्याचा शोध घेण्यास पोलिसांना जवळपास यश आले आहे. काही गोष्टींची खातरजमा केल्यानंतर हत्येचे कारण उघड केले जाणार आहे. साने राहत असलेल्या इमारतीमधील ४ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची पडताळणी केली जात आहे. शनिवारी मनोज सानेचे चुलत काका आणि चुलत भावांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. साने बरोबर आमचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मला दुर्धर आजार असल्याचे साने याने पोलिसांना सांगितले होते; परंतु बचाव करून सहानभूती मिळविण्याचा हा प्रकार आहे. त्या आजाराची वैद्यकीय चाचणी देखील केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्या आजारामुळे हत्या केली नसल्याचे त्याचा काहीच संंबंध नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्याने दिली.
अवशेष बहिणींना देणार: सरस्वती वैद्यचा मृतदेह जे जे रुग्णालयात जुळविण्यात आला असून तो सोमवारी तिच्या बहिणींना सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर तिच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तिच्या बहिणींच्या डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनोज साने ज्या गीता दिप इमारतीत राहत होता, तेथील रहिवाशांनी या घटनेचा धसका घेतला आहे.
फाशीसाठी पाठपुरावा करणार: शनिवारी संपूर्ण इमारत आणि परिसरात औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आला. भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शनिवारी पोलीस उपायुक्त जयंत बजबुळे यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली. आरोपी साने याला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
हेही वाचा:
- Religious Conversion In Delhi : राजधानीत जबरदस्तीने धर्मांतरण, उच्च शिक्षित तरुणाच्या मोबाईलमध्ये आढळली खळबळजनक माहिती
- Triple Murder In Bihar : माथेफिरू बापलेकांनी चाकूने भोसकले; जमिनीच्या वादातून घडले तिघांचे हत्याकांड, अनेकजण जखमी
- Beed Crime News: महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी; चोरट्यांनी मारला साडेबारा लाखावर डल्ला