ETV Bharat / state

कोरोनाच्या काळात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची पंचतारांकित हॉटेलवर ३५ कोटींची उधळपट्टी - BMC officers spend 35 crore

मुंबई महापालिकेकडून कोरोनाच्या काळात उधळपट्टी ( BMC expenditure during pandemic ) करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुंबई कर्मचाऱ्यांच्या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या प्रकरणाची आता कॅगकडून ( BMC CAG probe ) चौकशी होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
author img

By

Published : Dec 19, 2022, 8:13 AM IST

मुंबई - कोरोनाचा प्रसार असताना लॉकडाऊनमुळे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची मुंबईत हॉटेलमध्ये ( BMC employees stay in fiver stay hotel ) राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या हॉटेलवर तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला आयुक्त तथा प्रशासकीय अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.

३५ कोटींचा खर्च - मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. काही दिवसातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. देशभरात लॉकडाऊन लावल्याने तसेच कोरोनाची लागण झाल्यास कुटुंबालाही लागण होण्याची भीती असल्याने कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. यानुसार आरोग्य कर्मचारी, पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी हॉटेल, पंचतरांकीत हॉटेल बुक करून त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली.

असा झाला खर्च - प्रत्येक हाॅटेलमधील खोलीत दोन कर्मचारी राहतील असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार फाईव्ह स्टार हॉटेल प्रती खोली दोन हजार अधिक कर, फोर स्टार हॉटेलमध्ये १,५०० रुपये अधिक कर, थ्री स्टार हॉटेलमध्ये एक हजार रुपये अधिक कर, नॉन स्टार हॉटेलमध्ये ५०९ रुपये अधिक कर असा दर ठरवण्यात आला होता. कोरोना काळात पालिकेने अशा प्रकारे ३४ कोटी ६१ लाख ११ हजार ५३५ रुपये खर्च केले आहेत.

कॅगद्वारे ऑडिट होण्याची शक्यता - मुंबई पालिकेने गेल्या अडीच वर्षात केलेल्या खर्चाचे ऑडिट कॅगकडून केले ( CAG audit of BMC ) जात आहे. त्यात कोरोना काळात करण्यात आलेल्या ४ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. त्यातच आता कर्मचारी अधिकारी यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या व्यवस्थेवर तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे या खर्चाचेही ऑडिट होण्याची शक्यता असल्याचे समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.