ETV Bharat / state

BJP MLA Tamil Selvan: सरकारी कामात अडथळ्याच्या आरोपात भाजप आमदार तमिळ सेलवनसह इतर आरोपी दोषी - भाजप आमदार तमिळ सेलवन

BJP MLA Tamil Selvan: फाळणी नंतरच्या शरणार्थींच्या इमारतींचा पुनर्विकास (Redevelopment of Refugee Buildings) मुंबई महापालिका करत नाही. हा राग ठेवून 2017 मध्ये महापालिका कर्मचारी तसेच मुंबई पोलिसांच्या सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपात भाजपा आमदार तमिळ सेलवनसह इतर आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या न्यायालयानं 30 ऑक्टोबर रोजी यावर निर्णय दिलाय.

BJP MLA Tamil Selvan
तमिळ सेलवनसह इतर आरोपी दोषी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 9:36 PM IST

मुंबई BJP MLA Tamil Selvan: मुंबईतील जेटीबी नगर, सायन कोळीवाडा येथील भाजपाचे आमदार तमिळ सेलवन आणि इतर आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) दोषी असल्याचा निकाल दिलाय. भारत-पाकिस्तान फाळणी नंतर शरणार्थी इमारतींच्या पुनर्विकास कामात त्यांनी आणि त्यांच्या सोबत इतर 5 कार्यकर्त्यांनी लोकांना चिथावणी दिल्यानं सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपात न्यायालयानं त्यांना दोषी घोषित केलं. (BMC)

पुनर्विकास रखडला, जनतेची तक्रार: भारत-पाकिस्तान फाळणी नंतर मुंबईत हजारो लोकं शरणार्थी म्हणून निवास करत होते. त्यांची तिसरी पिढी जीटीबी नगर, सायन कोळीवाडा येथे राहत होती. केंद्र सरकारनं त्यांचे पुनर्वसन 60 वर्षांपूर्वी केले; मात्र त्या ठिकाणच्या इमारतींची दुरुस्ती पुनर्विकास नंतर केला नाही. पुनर्विकासासाठी सरकारी प्राधिकरण यांना जनतेनं अर्ज, निवेदनं दिली होती; परंतु महापालिका किंवा तत्कालीन महाराष्ट्र शासनानं यांची दखल घेतली नव्हती. त्यामुळेच जनतेची नाराजी होती.

पालिका, पोलिसांना केला मज्जाव: महापालिकेचं म्हणणं होतं की, पुनर्विकास करायचा आहे. पण, जनता घरं खाली करत नाही. तेव्हा महापालिकेनं पोलिसांचा फौजफाटा सोबत नेला; मात्र पोलिसांना जनतेनं विरोध केला. जनतेचं म्हणणं होतं की, महापालिका कोणताही विकास करत नाही. अनेक वर्ष केवळ तक्रार करून काही उपयोग झाला नाही. आता वीज आणि नळ जोडणी तोडून आम्हाला पुन्हा घराबाहेर काढण्याचा विचार असल्याची भावना जनतेची झाली होती; मात्र नेते कार्यकर्त्यांनी सरकारी कामकाजात अडथळा आणत पोलीस, महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. त्यात भाजपा आमदार तामिळ सेलवन सह गजानन पाटील, जसबीरसिंग बिरा, इंद्रपाल सिंग, दर्शन इतर आरोपी सामील झाले असं पोलिसांचं म्हणणं होतं. तब्बल 6 वर्ष खटला सुरू होता. न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या न्यायालयाने आरोपींना उपलब्ध तथ्य पुराव्याच्या आधारे दोषी निश्चित केलयं.

हेही वाचा:

  1. Sheena Bora murder case:शीना बोरा खून प्रकरण सुनावणी: साक्षीदारांच्या साक्ष अहवालावरुन अधिकाऱ्यांची सही गायब
  2. Javed Akhtar: जावेद अख्तर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा नाही, पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी
  3. Hanuman Chalisa case : हनुमान चालीसा प्रकरण! निर्दोष मुक्तीसाठी राणा दाम्पत्यांची मुंबई सत्र न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.