ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राज ठाकरेंना कार्टूनमधून चिमटा! - मनसे

राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेनेपासून वेगळे होत मनसे पक्ष काढला होता. तेव्हाच्या पहिल्या 2009 च्या निवडणुकीत मनसे वेगळे लढला होता. त्यावेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला होता. तर 2019 ची लोकसभा निवडणूक मनसेने लढविली नव्हती. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज ठाकरे
author img

By

Published : Sep 21, 2019, 5:48 PM IST

मुंबई - भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटा काढला आहे. राज ठाकरेंचा उल्लेख या व्यंगचित्रात चक्क ‘सोंगटी’ असा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांची तारीख आणि निकालाची तारीख जाहीर होताच भाजपने राज ठाकरेंवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘राज’मान्य खेळ असा मथळा या व्यंगचित्राला देण्यात आला आहे.

हेही वाचा - मुंबईत कोणाला किती जागा? आढावा...

राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेनेपासून वेगळे होत मनसे पक्ष काढला होता. तेव्हाच्या पहिल्या 2009 च्या निवडणुकीत मनसे वेगळे लढला होता. त्यावेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला होता. तर 2019 ची लोकसभा निवडणूक मनसेने लढविली नव्हती. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • असे आहे व्यंगचित्र -

या व्यंगचित्रात राज ठाकरे खेळाच्या मधोमध उभे आहेत, असे दाखवण्यात आले आहे. 2004 च्या चौकटीत शिवसेना, 2009 च्या चौकटीत मनसे दाखवण्यात आली आहे. तर 2019 लोकसभा निवडणुकीच्या 2 चौकटी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांच्या चौकटीत उभे राहिले आहेत, असे दाखवण्यात आले आहे. त्यापुढे 2019 ची विधानसभा निवडणुकीची चौकट आहे, त्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार? असा प्रश्न विचारुन भाजपाने राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा - 'या' निवडणुकीमुळे गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला मिळाली होती कलाटणी!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजेच आघाडीसोबत राज ठाकरे जातील, असा अंदाज लावला जात होता. मात्र, मनसेला सोबत घ्यायचे नाही, ही भूमिका काँग्रेसने घेतली. त्यामुळे मनसेला सोबत घेता आले नाही. हे शरद पवार यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र 'भाजपा महाराष्ट्र' या ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे.

  • विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार??

    शेवटी जनतेच्या मनोरंजनाचा प्रश्न आहे...!! pic.twitter.com/w3jg22M7Uv

    — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • 2009 ला मनसेची परिस्थिती -

राज ठाकरे हे 2004 च्या निवडणुकीवेळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांच्या पसंतीचे उमेदवार कमी देण्यात आले. त्यानंतर राज यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली. यानंतरच्या निवडणुका मनसे एकट्याने लढत होती. 2009 मध्ये मनसेचे 288 पैकी 13 आमदार निवडून आले. मुंबई, कल्याणच्या महापालिकेतही चांगले यश मिळाले. त्यामुळे शिवसेनेला मनसेचा मोठा फटका बसत होता. मात्र, राज ठाकरे यांची बदलती भुमिका पक्षाला मारक ठरत गेली.

  • 2014 मध्ये पंतप्रधान मोदींना पसंती -

2014 मध्ये लोकसभेला राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिली होती. मात्र, लोकसभा निवडणूकही लढविली होती. या दुटप्पी भुमिकेमुळे मनसेला खासदार निवडून आणता आला नाही. 2014 मध्ये विधानसभेला मनसेचा तर एकच आमदार निवडून आला. तोपर्यंत मनसेच्या नेत्यांनी रामराम करत शिवसेना, भाजपाचा रस्ता धरला होता.

  • 2019 मध्ये लोकसभा निवडणूक न लढवण्याची भुमिका -

यानंतर 2019 मध्ये लोकसभेला मनसेने निवडणूक न लढविण्याचीच भूमिका घेतली. यावेळी राज ठाकरेंनी 2014 च्या उलट भुमिका घेत पंतप्रधान मोदींना विरोध केला होता.

  • 'लाव रे तो व्हिडीओ'-

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंनी थेटपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली. भाजप विरोधातील मतांचे ध्रुवीकरण भाजपच्या पथ्यावर पडेल, या कारणामुळे राज यांनी हा निर्णय घेतला होता. एकही उमेदवार उभा नसताना राज ठाकरेंनी सभा घेतल्या. त्यामुळे त्यांच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात टाकायचा, असा प्रश्नही निवडणूक आयोगाला पडला होता. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीला भुमिका बदलण्याच्या राज ठाकरेंवर भाजपने व्यंगचित्रातून टीका केली आहे.

  • 2019 विधानसभा निवडणूकीबाबत मनसेची संभ्रमावस्था -

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असतानाही, निवडणूक लढण्याबाबत महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केलेली नाही.

हेही वाचा - मूर्तिजापूर मतदारसंघ: भाजपचे आमदार पिंपळे हॅट्रिकच्या तयारीत; विरोधकांचे कडवे आव्हान

Intro:Body:

raj thackeray

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.