मुंबई - पीएमसी बँकेला विलीनीकरण करण्यासाठी जो खर्च येईल, तो खर्च करण्यास रिझर्व्ह बँक अथवा इतर बँक तयार नाही. तेवढा अर्थपुरवठा बँकेजवळ नाही. त्यामुळे हा खर्च कोण करणार याबाबत आपण जयंत पाटील यांची भेट घेतली. बँक चालू होण्यासाठी खूप पैसे लागणार आहेत. हे लागणारे पैसे जर राज्य सरकार खर्च देण्यास तयार असेल, तर मी त्यांचे स्वागत करतो, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... नाशिकची माया भारत 'अ' संघात; चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी मिळाली संधी
गेल्या काही महिन्यांपासून पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात बंद पडल्यामुळे अनेक खातेधारकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. पैसे नसल्यामुळे अनेक खातेदारांची विविध कामे रखडली आहेत. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही खातेधारकांना आपला जीव देखील कामाला लागलेला आहे. त्यामुळे पीएमसी खातेधारकांना राज्य सरकारने लवकरात लवकर प्रयत्न करून त्यांना त्यांचे पैसे मिळवून द्यावे, यासाठी किरीट सोमय्या यांनी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खातेधारकांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी केली. राज्य सरकार जर पीएमसी बँकेला उभारणीसाठी मदत करत असेल, तर त्याचे आपण स्वागत करत आहोत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
हेही वाचा... आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले; ग्राहकांना दिलासा, तर शेतकरी हवालदिल