मुंबई - मेट्रो समितीने दिलेला अंतिम अहवाल स्वीकारणे सरकारला बंधनकारक नाही, असे विधान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन प्रतिउत्तर दिले आहे. पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला 'म्हातारीचा बूट' हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं ! असे ट्विट करून शेलारांनी आदित्य यांच्यावर मिश्किल टीका केली आहे.
-
पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ?
एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!
">पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2020
मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ?
एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2020
मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ?
एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!
मुंबईतील वादग्रस्त मेट्रो कारशेड शहरातील इतर ठिकाणी हलवणे व्यवहार्य नसल्याचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या ४ सदस्यीय समितीने नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - अहवालानुसार 'आरे'च्या ठिकाणीच कारशेड उभारावे, किरीट सोमैयांची मागणी
ज्या ठिकाणी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता, त्याच ठिकाणी कारशेड उभारावे, अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमैया यांनी केली. सोमैया यांच्या मागणीवर बुधवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आलेला अहवाल सरकारला स्वीकारणे बंधनकारक नाही, अशी प्रतिक्रिया दिली. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.