ETV Bharat / state

'लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप देशात मुस्लीमविरोधी वातावरण तयार करत आहे' - मुस्लिम विरोधी वातावरण मुस्लिम विरोधी वातावरण

आंबेडकर यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध केला आहे. हा घटनेचा द्रोह असून, अर्थव्यवस्थेसारखे मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लीम वातावरण तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशात जी नऊ रत्ने आहेत ती विकण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

ambedkar
वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Dec 9, 2019, 7:25 PM IST

Updated : Dec 9, 2019, 8:07 PM IST

मुंबई - भाजपचे सरकार देशात मुस्लीमविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आज गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा प्रस्ताव लोकसभेत मांडल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर

आंबेडकर यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. हा घटनेचा द्रोह असून, अर्थव्यवस्थेसारखे मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लीम वातावरण तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशात जी नऊ रत्ने आहेत ती विकण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा - सरकारने हिंदू-मुस्लिम फाळणी केली आहे; शिवसेनेचा अग्रलेखातून भाजपवर निशाणा

आंबेडकर म्हणाले, 'हे सरकार संविधानाचा ढाचा उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत आहे. आज देशापुढे ढासळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीसारख्या गंभीर समस्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी देशामध्ये मुस्लीम विरुद्ध इतर असे समीकरण करून धार्मिक भांडणे लावण्याचा सरकारचा हेतू आहे'

Intro:मुंबई

भारतीय जनता पक्षाचे सरकार देशात मुस्लिम विरोधी वातवरण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. आज लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरस्ती विधेयकाचा प्रस्ताव लोकसभेत मांडल्यानंतर आता आता या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होत आहे. आंबेडकर यांनीही या विधायकाला विरोध केला आहे. हा घटनेचा द्रोह असून, इतर मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लिम वातावरण तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली. Body:विशेष म्हणजे या देशात जी नऊ रत्ने आहेत ती रत्ने विकण्यासाठी हा सरकारचा प्रयत्न असल्याची देखील टीका आंबेडकर यांनी केली. तसेच भाजप आणि आरएसएस स्वतः चा आणि देशासंदर्भातील पर्यायी आराखडा लोकांसमोर न मांडता ते आज भारतीय संविधानाने दिलेला आणि सध्या देश ज्याच्यानुसार वाटचाल करतो आहे तो अस्तित्वात असलेला संविधानाचा ढाचा उध्वस्त करायचा प्रयत्न करत असल्याची टीका देखील त्यांनी केली.आज देशापुढे गंभीर आर्थिक समस्या व बेरोजगारीच्या समस्या आहेत त्यातून मार्ग काढण्यात सरकार अपयशी ठरत आहे अशावेळी लोकांच्या आर्थिक प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्यासाठी देशांमध्ये मुस्लिम विरुद्ध इतर असे ध्रुवीकरण करून धार्मिक झगडे लावण्याचा सरकारचा इरादा असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.Conclusion:
Last Updated : Dec 9, 2019, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.