ETV Bharat / state

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपा कोर्टात

मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसच्या रवी राजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती केली असल्याने भाजपाला हे पद देता येऊ शकत नाही, असे पालिकेच्या वतीने महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले होते. यामुळे विरोधी पक्षनेतेपदी मिळावे, यासाठी भाजपाने कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार प्रभाकर शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भाजप कोर्टात

author img

By

Published : Jun 23, 2020, 6:25 PM IST

मुंबई - राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यावर मुंबई महानगरपालिकेत भाजपाने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. तसेच विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. मात्र, हे पद भाजपाला देण्यात न आल्याने भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे भाजपाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. या याचिकेत शिंदे यांनी राज्याचा नगरविकास विभाग, मुंबई महानगरपालिका, आयुक्त आणि महापौर यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेत 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. याच काळात शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून भाजपाने साथ दिली. मात्र, केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता येताच भाजपाने 2017मधील महापालिकेची निवडणूक शिवसेनेची साथ न घेता लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे 84 आणि भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले होते. मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराला भाजपाने पाठिंबा देऊन मतदान केले होते. निवडणूक झाल्यावर भाजपने विरोधी पक्षनेते पदावर दावा न केल्याने पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद दोन ते तीन महिने रिक्त होते. यामुळे काँग्रेसने या पदावर दावा केला होता. त्यावर तत्कालीन भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी भाजपा कोणतेही पद घेणार नसल्याचे व पहारेकऱ्याची भूमिका पार पाडेल, असे घोषित केले होते. त्यामुळे संख्येने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले.

नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. शिवसेनेने राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्याचवेळी भाजपाने मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. भाजपाने विरोधी पक्षनेते पदावरही दावा केला. मात्र, पालिकेच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला विरोधी पक्षनेते पदावर नियुक्त केल्यावर त्याने राजीनामा दिल्यास, त्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यास त्याला या पदावरून हटवता येऊ शकते.

पालिकेत विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसच्या रवी राजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची या पदावर नियुक्ती केली असल्याने भाजपाला हे पद देता येऊ शकत नाही, असे पालिकेच्या वतीने महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले होते. यामुळे विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली जावी, यासाठी भाजपाने कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार प्रभाकर शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आले. त्यांनी आपले म्हणणे मांडल्यावर या याचिकेवर सुनावणी होईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तर, माझे म्हणणे मांडण्यासाठी माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही सूचना आली नसल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.