ETV Bharat / state

मुंबई महानगरपालिकेत भाजपकडून राष्ट्रगीताचा अवमान; गुन्हे दाखल करण्याची मागणी

महानगरपालिकेच्या सभागृहाला लागून असलेल्या भागात भाजपच्या नगरसेवकांनी विरोधी पक्ष नेते पदासाठी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी भाजप नगरसेवकांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

Mumbai Municipality
भाजपकडून राष्ट्रगीताचा अवमान
author img

By

Published : Mar 10, 2020, 7:59 AM IST

Updated : Mar 10, 2020, 8:14 AM IST

मुंबई - महानगरपालिकेत भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेऊन विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. मात्र, त्यांना हे पद देण्यास महापौरांनी नकार दिल्याने सभागृहात भाजपने गोंधळ घातला. सभागृहाला लागून असलेल्या भागात भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी भाजप नगरसेवकांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेत भाजपकडून राष्ट्रगीताचा अवमान

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष 25 वर्ष सत्तेत एकत्र होते. विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची युती तुटल्यावर भाजप आता विरोधी पक्षात बसला आहे. पालिकेतही भाजपने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने विरोधी पक्ष नेते पद नको, असे सांगितल्याने काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले आहे. यामुळे आता महापौरांनी भाजपचा विरोधी पक्ष नेते पदाचा दावा फेटाळला आहे.

हेही वाचा - मुंबईत होळीचा उत्साह, कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने साजरी होते होळी

भाजपचा दावा फेटाळल्याने नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी करत सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. घोषणाबाजी सुरू असतानाच सभागृहाचे कामकाज संपले. सभागृह संपताना नियमानुसार राष्ट्रगीत म्हणण्यात आले. मात्र, राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतरही भाजपची घोषणाबाजी सुरूच होती. भाजपच्या नगरसेवकांकडून राष्ट्रगीताचा अवमान करण्यात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

भाजपची राज्यातील सत्ता गेल्याने त्यांची मनस्थिती बरोबर नाही. भाजपाला सत्तेची हाव लागली आहे. सत्तेच्या हव्यासामध्ये त्यांनी राष्ट्र्रगीताचा अवमान केला. भाजपवाल्यांनी राष्ट्र्रगीताचा अवमान केला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

Last Updated : Mar 10, 2020, 8:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.