ETV Bharat / state

विखारी वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानीला तातडीने अटक करा - चंद्रकांत पाटील - भाजप चंद्रकांत पाटील लेटेस्ट न्यूज

'पुण्यातील एल्गार परिषदेतील उस्मानीच्या भाषणातील प्रक्षोभक वक्तव्य समाजा-समाजांमध्ये दुही माजविण्यासाठी कारणीभूत ठरेल. त्याचे वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्या संवैधानिक संस्थाच्या विरोधातील असून हा एका अर्थाने देशद्रोहाचा प्रकार आहे,' असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी योगींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी उस्मानीविरुध्द तत्काळ एफआयर दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. शर्जील उस्मानी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Feb 3, 2021, 7:11 PM IST

Updated : Feb 3, 2021, 10:37 PM IST

मुंबई - 'हिंदू समाज सडलेला आहे..,' असे विखारी वक्तव्य करणारा उत्तर प्रदेशचा नागरिक शरजील उस्मानी याला तातडीने अटक करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी मुख्यमंत्री योगींना पत्र लिहिले आहे,

हेही वाचा - हिंदूंना कोणी शिव्या दिल्या तर ऐकून घेतले जाणार नाही - गुलाबराव पाटील

योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून शरजील उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये मूळ उत्तर प्रदेशचा नागरिक असलेल्या उस्मानीने हिंदू समाजाच्या विरोधात अतिशय प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विखारी वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

शर्जील उस्मानी हा उत्तर प्रदेश येथील आजमगढ जिल्ह्यातील सिधारी या गावातील मूळ नागरिक आहे. हिंदू समाजाच्या विरोधात विखारी वक्तव्य करणाऱ्या उस्मानीच्या विरोधात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने तत्काळ कारवाई करणे आवश्यक होते. पण आज पाच दिवस झाले तरी त्याच्याविरोधात कुठलीच कारवाई महाराष्ट्रातील सरकारने केली नाही. तसेच, यापुढेही त्याच्याविरोधात सरकार कारवाई करेल, अशी खात्री सध्या वाटत नाही. त्यामुळे हिंदूविरोधात वक्तव्य करणाऱ्या उस्मानीच्या विरोधात आपल्या सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात कुठलीही व्यक्ती, कोणताही समाज वा धर्माच्या विरोधात अशा प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्याचे धाडस करणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

'हा एका अर्थाने देशद्रोहाचा प्रकार'

विशेष म्हणजे, हा शर्जील उस्मानी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. पुणे येथील एल्गार परिषदेत त्याने त्याच्या भाषणात केलेले वक्तव्य हे समाजा-समाजांमध्ये दुही माजविण्यासाठी कारणीभूत ठरेल, अशा प्रक्षोभक स्वरुपाचे आहे. त्याचे वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्या संवैधानिक संस्थाच्या विरोधातील असून हा एका अर्थाने देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे उस्मानीच्या विरुध्द तत्काळ एफआयर दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - एल्गार परिषदेचे आयोजक कोळसे-पाटील यांच्यावर कारवाईची ब्राह्मण महासंघाची मागणी

Last Updated : Feb 3, 2021, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.