ETV Bharat / state

'त्या' बारा आमदारांच्या नावांची फेरफार सरकार करतेय - केशव उपाध्ये

author img

By

Published : Jun 2, 2021, 6:55 PM IST

Updated : Jun 2, 2021, 8:24 PM IST

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सातत्याने कलगीतुरा बघायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका 'आरटीआय' अहवालाचा उत्तर देत महाविकास आघाडी सरकारवर या प्रकरणावरून निशाणा साधला आहे.

केशव उपाध्ये
केशव उपाध्ये

मुंबई - विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सातत्याने कलगीतुरा बघायला मिळत आहे. राज्यपालांकडे बारा जणांची नावे पाठवलेले आहेत. मात्र, राज्यपाल दिरंगाई करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होत आहे. याच मुद्द्यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका 'आरटीआय' अहवालाचा उत्तर देत महाविकास आघाडी सरकारवर या प्रकरणावरून निशाणा साधला आहे.

बोलताना केशव उपाध्ये

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या या प्रकरणाला आता नविनच वळण मिळताना दिसत आहे. त्यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यांनी ट्विट केले आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, त्या बारा आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उत्तर मिळालेले आहे. प्रश्न होता प्रस्ताव कधी पाठवला? कोणती नावे पाठवली? काही उत्तर आले का? हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले आहे. मात्र, आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे, असा सवाल देखील भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमधून विचारलेला आहे.

हा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते सोमेश कोळगे यांनी माहितीच्या अधिकारात उघड केलेली आहे. आता खुलासा व्हायला हवा. यापूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव हा महाविकास आघाडी सरकारचा आहे का? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? या तिन्ही पक्षांमधील रोज वाद-विवाद हे जनतेसमोर बाहेर येत आहेत. त्याच पद्धतीने या बारा आमदारांच्या बाबतीत सुद्धा या तीन पक्षांमध्ये कलह आहे का? मुख्यमंत्री मंत्रालयात जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का? या प्रकरणावरून असा सवाल केशव उपाध्याय यांनी उपस्थित केलेला आहे.

हेही वाचा - दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे देशभरातील 594 खासगी डॉक्टरांचा मृत्यू

Last Updated : Jun 2, 2021, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.