मुंबई : दिवाळीमधील भाऊबीज ( Bhau Beej ) हा सण विशेष मानला जातो. या दिवशी बहिण भावाला ( Sister waves to brother ) ओवाळते. त्या बदल्यात बदल्यात भाऊ बहिणीला भेटवस्तू ( Diwali Celebration ) देतो. लहान असतानाची दिवाळी अनोखीच असते. तेव्हा घरातले वडिल धारी माणसे बहिणीसाठी बाजारातून भेटवस्तू आणतात. आणि लहान भावाला देतात. जेणेकरून तो त्याच्या लहान बहिणी भेट देऊ शकतो. आता अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन गिफ्ट पाठवणे, पैसे देणे असे अनेक मार्ग निर्माण झाले आहेत.
बहिण भावाला ओवाळते : दिवाळी सणाची वाट अनेक लोक पाहात असतात. दिवाळीमधील भाऊबीज हा सण विशेष मानला जातो. भाऊ आणि बहिणीचा हा सण सर्व जण आनंदाने साजरा करतात. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यावे? तुम्हाला जर तुमच्या बहिणीला भाऊबीजेच्या दिवशी खास आणि हटके गिफ्ट द्याचे असेल तर हे गिफ्टचे ऑप्शन्स एकदा नक्की पाहा
ड्रेस : जर तुमच्या बहिणीला ट्रेडिशनल कपडे आवडत असतील तर तुम्ही तिला साडी किंवा ट्रेडिशनल ड्रेस देऊ ( Give traditional clothes to sister ) शकता. जर बहिणीला मॉडर्न कपडे आवडत असतील तर तुम्ही तिला वन पिस देऊ शकता. आज काल ड्रेसेसमध्ये अनेक व्हाराईटीज आल्या आहेत. पंजाबी ड्रेस, कुर्ता लेगींज, शॉर्ट ड्रेसेस अशा अनेक गोष्टी कपड्यांमधून तुम्हा बहिणीला देऊ शकता. ज्यानेकरून दिवाळीमधील भाऊबीज हा सण तुमचा हमखास आनंदी जाणार.
चॉकलेट्स : अनेकांना चॉकलेट्स खायला आवडतात. त्यामुळे जर तुमच्या बहिणीला वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स खायला आवडत असतील तर तुम्ही डार्क चॉकलेट किंवा व्हाइट चॉकलेट तिला गिफ्ट देऊ( Give chocolates to sister ) शकता. सध्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या गिफ्ट बॉक्समध्ये चॉकलेट्स मिळतात. अनेक फ्लेवर्समध्ये देखील चॉकलेट्स मिळतात. ते तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ शकता.
दागिने : अनेक महिला आणि मुलींना चांदी किंवा सोन्याचे दागिने घालायला आवडतात. वेगवेगळे सेट, कानातले, गळ्यातले, नथ इत्यादी दागिने तुम्ही बहिणीला या भाऊबीजेला देऊ शकता. अंगठ्या, कानातले, हार, ब्रेसलेट या दागिने देखील तुम्ही देऊ ( Give jewelry to sister ) शकता. ते शक्य नसल्यास ओवाळमीत तुम्ही तुमच्या बहिणीला पैसेदेखील देउ शकता.