मुंबई : हिवाळ्यात लग्नासाठी तुम्ही तारीख निश्चित केली आहे. परंतू अद्याप ठिकाण निश्चित केले नाही. तर तुम्हाला ही माहिती गरजेची आहे. आम्ही तुमच्यासाठी काही मोजकी लग्नाची ठिकाणे ( Wedding Destination ) आणली आहेत. त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.
ऋषिकेश : पवित्र गंगा नदी ज्या ठिकाणाहून वाहते ते ऋषिकेश डेस्टिनेशन वेडिंगसाठी ( Rishikesh Destination Wedding) भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. धार्मिक स्थळ असल्याने अनेक धार्मिक कामे ऋषिकेशमध्ये केली जातात. जर तुम्हालाही असं स्वप्नात पाहिलेल लग्न हवं असेल, तर कोणताही विचार न करता ऋषिकेश तुमची वाट पाहत आहे. ऋषिकेशमध्ये तुम्हाला अनेक रिसॉर्ट्स सापडतील जे तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतील.
शिमला : बर्फाच्छादित पर्वत आणि हिरव्यागार लँडस्केपसह, तुम्हाला लग्नात रोमँटिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. शिमला त्यासाठी योग्य ठिकाण आहे. शिमला भारतातील लोकप्रिय वेडिंग डेस्टिनेशन ( Shimla wedding destination ) एक आहे.
केरळा : केरळा भारतातील देवांची भूमी म्हणून ओळखले जाणारे राज्य आहे. कोवलम आणि वर्कला समुद्रकिना-याच्या दृश्यांपासून ते मुन्नारच्या चहाच्या बागांपर्यंत, मनमोहक दुश्य पाहण्यासाठी केरळ नक्किच सर्वांची पसंती आहे. चहाच्या बागांमध्येत तुमची इंगेजमेंट पार्टी ( Engagement Party ) आयोजित करू शकता, तुम्ही तुमच्या पसंतीच्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एका ठिकाणी तुमच्या लग्नाचा सोहळा आयोजित करू शकता.
गोवा : तुम्ही कोणत्याही ऋतूत लग्न करायचा विचार केला तरीही गोवा नेहमीच तुमची ही अडचम सोडवण्यासाठी समर्थ असेल. बर्याच लोकांसाठी, हे केवळ प्रवासाचे नाही तर इथे लग्न करण्याचे देखील स्वप्न आहे. भव्य समुद्रकिनारे, स्वच्छ निळे आकाश यांचे मिश्रण असलेले हे भारतातील लक्झरी वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. तुमचा विवाह सोहळा आनंददायी बनवण्यासाठी अनेक सुंदर बीच रिसॉर्ट्स आहेत. बीच साईड वेडिंग ( Beach side wedding ) आता फार लोकप्रिय आहेत.
जोधपूर : भारताची वाळवंटाची राजधानी, जोधपूर, हे देखील एक भव्य स्थळ आहे. जोधपूर राजस्थानमध्ये येते. परिपूर्ण हिवाळ्यातील लग्नासाठी उम्मेद भवन आणि रानबंका पॅलेस हॉटेल्स यांसारख्या विलक्षण पॅलेस हॉटेल्सपैकी कोणीही निवडू शकतो. सर्व शाही वातावरणाबरोबरच, तेथील समृद्ध संस्कृती आणि पाककृती याला एक अतिरिक्त खास बनवतील.
आग्रा : प्रेमाचे प्रतिक ओळखले जाणारे ताजमहाल आग्रामध्ये आहे. प्रेमी युगुले, नवविवाहीत जोडपी, वयोवृद्ध हे ताजमहाल पाहण्यासाठी आग्राला खास भेट देतात. त्यामुळे अनेकाचा आग्रात लग्न समारंभ आयोजीत करण्याचा कल असतो.
ओरछा : ओरछा मध्यप्रदेशमध्ये येते. या ठिकाणची समृद्ध संस्कृती लग्नसराईंच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हे भारतातील सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक विवाह स्थळांपैकी एक आहे. ऐतिहासिक महत्त्व, चित्तथरारक सौंदर्य आणि मोहक वातावरण जोडप्यांना प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही. स्वप्नातील लग्नाच्या सौंदर्यात ते पुरेपूर उतरते.
अंदमान : अंदमानचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आहे. त्याशिवाय, समुद्रकिनाऱ्यांनी वेढलेले आढळेल.जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने इथे रिसॉर्टची कमी नाही. विशेष सोयींचीही इथे सुविधा आहे. तुम्ही फक्त तुमच्या लग्नाची तारीख निवडा आणि त्यानंतर रिसॉर्टला कळवा रिसॉर्ट प्रशासन स्वत: सर्व तयारी करून देतात.