मुंबई: देशभर गाजलेल्या गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांडा संदर्भातील खटल्याचा आज निकाल लागला आहे. दोन्ही आरोपींना मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात ठेवलेले आहे. मफत
मनीलाल गोहिल व हर्षद रावजी भाई सोलंकी दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने दोष मुक्त केले आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या गुजरातच्या गोध्रा जळीतकांडानंतर बेस्ट बेकरीच्या आवारात हत्याकांड झाले होते. त्यात घडलेल्या १४ जणांच्या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला. हत्याकांडातील दोन आरोपींच्या कथित सहभागाबाबत मुंबई सत्र न्यायालयाने आज हा निकाल देत अखेर या प्रकरणावर कायमचा पडदा पाडला.
निकालाला वेळ का लागला: न्यायालया समोर असंख्य याचिका प्रलंबित आहेत. त्या व्यस्ततेमुळे अजून निकालपत्र पूर्ण होऊ शकलेले नाही. या कारणांनी सुनावणी मे ते जून 2023 मध्ये तहकूब झाली होती. अनेकांना आज फैसला होईल असे वाटत होते. तब्बल २१ वर्षानंतर २ आरोपींबाबत न्यायालयाने निकाल दिला. निकाल मार्च महिन्यात जाहीर केला जाणार होता. त्यामुळे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले होते. मात्र न्यायालयाच्या निकालपत्र पूर्ण होऊ न शकल्यामुळे निकाल १५ मार्चपर्यंत लांबणीवर पडला. भरपूर प्रलंबित प्रकरण असल्यामुळे हे प्रकरण पुढे ढकलले. त्यामुळे याबाबत जनतेची उत्सुकता कायम होती.
गोध्रचा खटला मुंबईत कसा वर्ग झाला देशाला हादरवून टाकणारी गोध्रा येथे दंगल झाली होती. त्या हत्याकांडानंतर वडोदरा या गावी हनुमान टेकडीवर बेस्ट बेकरी येथे असंख्य लोकांनी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पावले होते. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा खटला मुंबई न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला होता. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली होती. बेस्ट बेकरी हत्याकांडाच्या घटनेत दोन व्यक्तींवर आरोप ठेवण्यात आले. त्यामध्ये हर्षद सोळंकी आणि मफत मनीलाल गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. सत्र न्यायालयात एकूण चार आरोपींविरुद्ध खटला उभा चालवला गेला होता. मात्र एकूण चार आरोपींपैकी दोन आरोपींचा मृत्यू झाला. सोळंकी व गोहिलविरुद्ध सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले आहेत. हे दोघे निर्दोष असल्याचा निकाल न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी आज दिला.
नेमेके काय घडले होते? 2004 मध्ये मानवाधिकार आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भात विनंती याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील 21 आरोपींनी दबावाखाली असल्याची भूमिका माध्यमासमोर मांडली होती. सर्वोच्च न्यायालयाने मग या खटला संदर्भात पुनर्विचार करा असे निर्देश दिल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयामध्ये या खटल्याची पुन्हा सुनावणी सुरू झाली. दोन्ही आरोपींना 2013 मध्ये या संदर्भात अटक करण्यात आली होती.
Best Bakery case : बेस्ट बेकरी प्रकरणात दोन्ही आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
बेस्ट बेकरी खटल्यात दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने दोष मुक्त केले आहे. या खटल्याचा निकालासाठी तारीख पे तारीख मिळत होत होती. अखेर आज निकाल लागला आहे.