मुंबई - आंतराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे 'क्विन काऊंसिल' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साळवे हे आपल्या कायद्याच्या ज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जातात. कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरणात साळवे यांनीच पाकिस्तानविरोधात कुलभूषणची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात ताकदीने मांडली होती. यासाठी त्यांनी केवळ १ रुपया मानधन घेतले होते.
ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने १३ जानेवारीला नव्या नियुक्त्यासंदर्भात यादी प्रसिद्ध केली. यामध्ये साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. साळवे यांची १६ मार्चला अधिकृत नियुक्ती होईल. वकिलीच्या क्षेत्रात विशेष प्राविण्य दाखवलेल्या वकिलांनाच ब्रिटनच्या महाराणीचे 'क्विन काऊंसिल' म्हणून नेमतात.
कोण आहेत साळवे
१) हरिश साळवे हे मूळ धुळे जिल्ह्यातील वरुड गावचे
२) त्यांचे आजोबा पी के साळवे हे प्रख्यात क्रीमिनल लॉयर होते तर वडिल एन के साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.
३) १९१९२ मध्ये साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील
४) साळवे हे वकिलीआधी सीए झाले, प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी वकिली पूर्ण केली
५) अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 1999 ते २००२ मध्ये ते भारताचे सॉलिसिटर जनरल होते.
६) कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढवली होती.
७) टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी सांभाळली होती.
८) सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाची केस साळवे यांनी सलमानच्या बाजून लढवली होती.
९) बिकलीस बानोची केसही साळवे यांनीच लढवली होती.