ETV Bharat / state

BKC Bullet Train : बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बुलेट ट्रेन रेल्वे स्टेशनच्या कामाला नववर्षात सुरुवात होणार

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad Bullet Train) मार्गातील वांद्रे कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex) या ठिकाणी रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे. मात्र त्याबाबतचे कोणतेही काम सुरू झालेले नव्हते आता त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात तीन कंपन्यानी बोली लावली आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बुलेट ट्रेन रेल्वे स्टेशनच्या ( Bullet Train Railway Station) डिझाइन आणि बांधकामासाठी आर्थिक निविदा काढण्यात आल्या आहेत.

Bullet Train
बुलेट ट्रेन
author img

By

Published : Dec 31, 2022, 10:50 PM IST

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरसाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra Kurla Complex) स्टेशनच्या डिझाइन आणि बांधकामासाठी आर्थिक निविदा उघडल्या. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड वतीने वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी स्टेशन उभारणीच्या कामासाठी आता कुठे सुरुवात केली आहे. यामुळे आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला येत्या काळामध्ये सुरुवात होईल. (work start in New Year) तांत्रिकदृष्ट्या तीन पात्र बोलीदारांच्या आर्थिक बोली आज राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळ (National Motive Railway Corporation) वतीने उघडण्यात आल्या. त्यात मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड संयुक्त उपक्रम तसेच एमईआय एल एच सी सी संयुक्त उपक्रम यांनी सर्वात कमी बोली लावली.

महाराष्ट्रातील भूसंपादन 98 टक्के पूर्ण : मुंबई ते अहमदाबाद प्रकल्पातील अहमदाबाद ते वापी ३५० किलोमीटरचा मार्ग २०२७ किंवा २०२८ मध्ये पूर्ण होऊन तो सेवेत येईल. त्याआधी या टप्प्यातील सुरत ते बिलिमोरा मार्ग २०२६ पर्यंत सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील भूसंपादन 98 टक्के पूर्ण झाले आहेत. हे संपूर्ण भूसंपादन केल्या नंतर प्रकल्पाची अंतिम मुदत निश्चित होईल. सध्या सुरतमध्ये बुलेट ट्रेनचे स्थानक, उन्नत मार्गिकेसाठी गर्डर बसविण्याचा कामांना वेग दिला जात असून विविध कामांमुळे एक लाख रोजगार निर्मिती झाली आहे. याशिवाय प्रकल्पात येणाऱ्या सात नद्यांवर पूलही बांधण्यात येणार आहेत.

कामाला गती मिळणार का? "बुलेट ट्रेन प्रकल्प गुजरात, दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. आता गुजरात आणि महराष्ट्रात ९८ टक्के भूसंपादन झाले. आर्थिक निविदा मुळे आता वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती मिळेल. ह्या निविदा मध्ये मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड संयुक्त उपक्रम तसेच एमईआय एल एच सी सी संयुक्त उपक्रम यांनी सर्वात कमी बोली लावली.तर या संदर्भातील तांत्रिक निविदा 4 नोव्हेंबर 2022 रोजी खुल्या केल्या होत्या;" असे राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी सांगितले.

कोणती स्थानके असणार : एकूण ५०८ किमी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे बुलेट ट्रेनची स्थानके असतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.