मुंबई - मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केलेल्या अनलॉकच्या घोषणेमुळे गोंधळ निर्माण झाला होता. वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने यावर अजून निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केलं आहे. या घटनांमुळे महाविकास आघाडीमध्ये विसंवाद असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कसलाही विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपचे राजकारण
वडेट्टीवारांना राज्यकारभाराचा त्यांना अनुभव आहे. पण, काही विषयांवर संभ्रम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यास हा संभ्रम दूर होईल. भाजप नेते महाविकास आघाडीत असमन्वय निर्माण होण्याची वाट पाहत असल्याचेही थोरात म्हणाले. पण, महाविकास आघाडीत कसलाही विसंवाद नाहीये. सगळ्यांनी एकत्र मिळून काम करावं लागणार आहे, असेही थोरात म्हणाले. तसेच केंद्राकडून आलेले व्हेंटिलेटर सदोष होते. मात्र, भाजप याबाबत राजकारण करत असल्याचा आरोप थोरातांनी केला आहे.