ETV Bharat / state

सरकारच्या विरोधात प्रश्न विचारले म्हणून राज ठाकरेंना नोटीस - बाळासाहेब थोरात - balasaheb thorat

विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत म्हणून, त्यांना ईडीच्या नोटीस बजावल्या जात असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.

बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Aug 19, 2019, 9:10 PM IST

Updated : Aug 19, 2019, 9:29 PM IST

मुंबई - विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत म्हणून त्यांना ईडीच्या नोटीस बजावल्या जात असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात काही प्रश्न उपस्थित केले होते. सरकार त्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. राज ठाकरेंवर दबाव आणण्यासाठी त्यांनाही ईडीची नोटीस बजावली असल्याचे थोरात म्हणाले.

राज्यात आणि देशांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी सरकारकडून दबावतंत्र सुरू असल्याचे थोरात म्हणाले. दबावतंत्राचा एक भाग म्हणून विरोधकांना नोटीस बजावल्या जातात. तर कधी सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकले जात असल्याचा आरोप थोरातांनी केला.

बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तरे द्यायला हवी होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. अशा प्रकारचे दबावतंत्र हे लोकशाहीला घातक असल्याचेही थोरात म्हणाले.

माहिती घेऊनच बोलेन - मनोहर जोशी

माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, की माझ्या मुलाला यासंदर्भात नोटीस आल्याचे मला कळले आहे. मी त्यासंदर्भात माहिती घेऊन आपल्याशी बोलेन. परंतु, काय नोटीस आहे हे माहीत नसल्याने मी यावर फार बोलणार नसल्याचे ते म्हणाले.

Intro:विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले म्हणून त्यांना ईडीच्या नोटीस बजावल्या जाताहेत ;बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

mh-mum-01-cong-thorat-joshi-byte-7201153

मुंबई, ता. १९:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात काही प्रश्न उपस्थित केले होते, त्या प्रश्नाला सरकारने उत्तर देण्याऐवजी त्यासाठीची बगल दिली आणि आता त्यांच्यावर दबाव तंत्र वापरण्यासाठी आता त्यांनाही ईडीची नोटीस बजावली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली
राज्यात आणि देशांमध्येही शेतकऱ्यांचे गरिबीची आणि बेरोजगारीचे प्रचंड मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हावे आणि विरोधकांनी हे त्याविषयी काहीच बोलू नये, यासाठी दबावतंत्र या सरकारमधून सुरू आहे. आणि या दबावतंत्राचा एक भाग म्हणून विरोधकांना नोटीस बजावल्या जातात. तर कधी सीबीआय आणि इन्कम टॅक्स धाडी टाकले जातात असा आरोप थोरात यांनी केला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना खरतर या सरकारने उत्तर द्यायला पाहिजे होती परंतु उत्तर दिले नाही आता त्यांचा आवाज काढण्यासाठी त्यांना नोटीस बजावली असून प्रकारचे हे दबावतंत्र लोकशाहीला घातक असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी यांना या संदर्भात विचारले असता त्याने म्हणाले की माझ्या मुलाला यासंदर्भात काही नोटीस आल्याचे मला कळले. मी त्या संदर्भात माहिती घेऊन आपल्याशी सांगेल परंतु काय नोटीस आहे हे माहीत नसल्याने मी यावर काही फार बोलणार नसल्याचे ते म्हणाले.Body:विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले म्हणून त्यांना ईडीच्या नोटीस बजावल्या जाताहेत ;बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
Conclusion:
Last Updated : Aug 19, 2019, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.