ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : विरोधी पक्षांची आघाडी कमकुवत करण्याचा प्रयत्न?

author img

By

Published : Jul 2, 2023, 6:29 PM IST

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या प्रयत्नांना हर प्रकारे खेळ घालण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली असल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis

मुंबई : केंद्र सरकारच्या आणि भाजपच्या विरोधात देशभरामध्ये रान पेटवून विरोधकांची मजबूत आघाडी तयार करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षांनी, प्रादेशिक पक्षांनी सुरू केला आहे. या प्रयत्नांमध्ये केसीआर, नितीश कुमार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार हे महत्त्वाचे नेते आघाडीवर आहेत.

फोडा, राज्य करा : दरम्यान भारतीय जनता पक्षांनी आतापर्यंत ज्या ज्या पक्षासोबत युती केली, त्या त्या पक्षाला संपवण्याचे काम केले आहे. यापूर्वी त्यांनी नितीश कुमार, पंजाबमध्ये अकाली दल, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा ज्या पक्षासोबत जातो त्या पक्षाला संपवतो, अशी या पक्षाची ख्याती आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपाने आपल्या कुटीलनीतीने आणि दबाव तंत्राने फोडली आहे अशी, चर्चा सुरू झाली आहे, असे राष्ट्रीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी सांगितले.

राज्यातील शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपाने आपल्या कुटीलनीतीने आणि दबाव तंत्राने फोडली आहे अशी, चर्चा सुरू झाली आहे - विश्लेषक आनंद गायकवाड

पवारांना नाउमेद करण्याचा प्रयत्न : विरोधी पक्षांची मोट बांधून ठेवण्यात आणि त्यांना एकत्र ठेवण्यामध्ये शरद पवार हे एक महत्त्वाची भूमिका बजावणार हे स्पष्ट झाले होते. शरद पवार हे या एकजुटीच्या केंद्रस्थानी होते. त्यांनी सर्व पक्षांना आणि सर्व नेत्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस शिवाय या विरोधकांच्या आघाडीला पर्याय नाही, हे सुद्धा शरद पवार यांनी ठासून सांगितले. त्यामुळे विरोधकांना काँग्रेसला सोबत घ्यावे लागले. एकूणच ही आघाडी अधिक मजबूत होते असे, चित्र दिसत असल्यामुळे शरद पवारांना जर नामोहरम केले. तरच आपला टिकाव लागेल हे लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पक्ष विविध अस्त्रांचा वापर करीत होते. त्यातले सर्वात महत्त्वाचे ब्रह्मास्त्र म्हणजे पक्ष फोडणे हे त्यांनी आज केले असेही गायकवाड म्हणाले.

तिसरी आघाडी कमकुवत करण्याचा प्रयत्न? : महाराष्ट्र हे देशाच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाचे राज्य आहे महाराष्ट्रात असलेल्या खासदारांची संख्या 48 ही निर्णायक संख्या आहे. भारतीय जनता पक्षाचे यातील अर्धे खासदार वगळले तर, उरलेले किमान 25 खासदार हे अन्य पक्षांचे आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. शिवसेना फुटल्यानंतर काही खासदार भाजपच्या गोटात सामील झाले आहे. मात्र, तेवढ्याने भाजप मजबूत होणार नाही हे लक्षात आल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या महाराष्ट्रामध्ये मजबूत असलेल्या पक्षाला फोडता येईल का याविषयी भाजपने प्रयत्न केला.

पक्षातील नाराजीचा फायदा : केंद्रीय यंत्रणांचा आणि पक्षातील नेत्यांच्या नाराजीचा फायदा घेत त्यात ते यशस्वी झाले आहेत. वास्तविक तिसरी आघाडी यामुळे कमकुवत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण निवडून आलेले अनेक खासदार आज भाजपच्या सोबत आहेत. मात्र असे असले तरी शरद पवार यांचे राज्यातील स्थान आणि त्यांना मानणारा वर्ग तसेच मतदार हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जर मागे उभे राहिले तर तिसऱ्या आघाडीला कमकुवत करण्याचा होत असलेला प्रयत्न तितकाचा सफल होणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - NCP Political Crisis : अजित पवारांनी 'का' केले बंड?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.