ETV Bharat / state

भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे - अशोक चव्हाण - काँग्रेस नेते अशोक चव्हाण

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू होण्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना ही टीका केली.

अशोक चव्हाण, काँग्रेस नेते
author img

By

Published : Nov 6, 2019, 8:14 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने जो कौल दिला आहे. त्यात कोणत्याच एका पक्षाला बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे मत असे आहे की, राज्यात आता भाजप सरकार येऊ नये, मागील 5 वर्षात भाजप सरकारने खूप नुकसान केले आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस नेते व माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

अशोक चव्हाण, काँग्रेस नेते

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू होण्यापूर्वी अशोक चव्हाण माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा - शिवसेनेने भाजपसोबत जाऊ नये, आपची मागणी

यावेळी चव्हाण म्हणाले की, राज्यात भाजपच्या बाजूने कौल नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी ठोस निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत विषय संपेल, असे मला वाटत नाही. काँग्रेसने सत्तास्थापन करण्याचा प्रश्न नाही. आम्ही कोणास पाठिंबा द्यायचा मुद्दा आता आला नाही. आज आम्ही काही नेत्यांसोबत चर्चा करणार आहोत. मात्र, आमची भूमिका ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवावी, अशी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबई पोलिसांनी शेतकरी मोर्चावरुन 'आप'च्या धनंजय शिंदेंवर केला गुन्हा दाखल

मागील 5 वर्षात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले असून त्यासाठी भाजपने ठोस असे काहीही केलेले नाही. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे चव्हाण म्हणाले.

Intro:आता भाजपा सरकार येऊ नये - अशोक चव्हाण
mh-mum-01-cong-ashokchavan-byte-7201153

मुंबई, ता. ६ :
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने जो कौल दिलं आहे, त्यात कोणत्याच एका पक्षाला बहुमत नाही. त्यात काँग्रेस पक्षाचे मत असे आहे की राज्यात आता भाजपा सरकार येऊ नये, मागील पाच वर्षात भाजपा सरकारने नुकसान खूप केले असल्याची टीका काँग्रेसचे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झाले असून या बैठकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना ही टीका केली.
चव्हाण म्हणाले की,राज्यात भाजपाच्या बाजूने कौल नाही. काँग्रेस एनसीपी ठोस निर्णय घेत नाहीत. तो पर्यंत मला वाटत नाही विषय संपेल. हुसैन दलवाई यांच्याकडून काँग्रेस निरोप घेऊन द्यायचा प्रश्न नाही, राजकीय अनिश्चिता आहे. काँग्रेस सत्तास्थापन होण्याचा मुद्दा नाही, आम्ही कोणास पाठिंबा द्यायचा मुद्दा आता आलाच नाही. आज आम्ही चर्चा काही नेत्यांसोबत चर्चा करणार आहोत, मात्र आमची भूमिका ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवावी अशी असल्याचे ते म्हणाले. मागील पाच वर्षात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले असून त्यासाठी या भाजपाने ठोस असे काहीही केलेले नाही, यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे चव्हाण म्हणाले.Body:आता भाजपा सरकार येऊ नये - अशोक चव्हाण Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.