ETV Bharat / state

Anu Kapoor Bank Account Fraud : अनू कपूर यांच्या बँक खात्याची केवायसीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास अटक

सिनेअभिनेते अनू कपूर यांच्या बँक खात्याची (Anu Kapoor Bank Account Fraud) केवायसीच्या नावाखाली फसवणूक (KYC Fraud) करणाऱ्या सायबर गुन्ह्यातील आरोपीला (Cyber Crime Accused Arrested) दरभंगा बिहार येथून ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime. सायबर फ्रॉडनंतर त्यांचे थोडेथोडके नव्हे तब्बल ४ लाख ३ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. बँक कर्मचारी असल्याची बतावणी करत या भामट्यांनी त्यांना फसवले.

Anu Kapoor Bank Account Fraud
केवायसीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास अटक
author img

By

Published : Nov 23, 2022, 1:54 PM IST

Updated : Nov 23, 2022, 3:20 PM IST

मुंबई : सिनेअभिनेते अनू कपूर यांच्या बँक खात्याची (Anu Kapoor Bank Account Fraud) केवायसीच्या नावाखाली फसवणूक (KYC Fraud) करणाऱ्या सायबर गुन्ह्यातील आरोपीला (Cyber Crime Accused Arrested) दरभंगा बिहार येथून ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

खात्यातून 4 लाख रुपये लंपास - बँका, सरकारी संस्था, पतपेढ्या, इन्शुरन्स संस्था यांच्याकडून वारंवार सांगितले जाते की, सायबर क्राइमपासून सावध राहा! पण अजूनही अनेकांना याबाबत सतर्क राहण्याचे महत्त्व कळलेले नाही. सामान्य माणसांची तर दर दिवसाला फसवणूक होते आहे. असाच काहीसा प्रकार बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर यांच्याबाबतीत घडला होता. या सायबर फ्रॉडनंतर त्यांचे थोडेथोडके नव्हे तब्बल ४ लाख ३ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. बँक कर्मचारी असल्याची बतावणी करत या भामट्यांनी त्यांना फसवले. याप्रकरणी अनोखापुर यांनी ओशोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आरोपीला अटक- त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला अटक केली. हा आरोपी बिहार येथील दरभंगा येथील आहे. आशिष जगदीश पासवान (28 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. आशिष जगदीश पासवान (वय 28 वर्ष) हा सुहाग बिल्डिंग लल्लुभाई पार्क, एस व्ही रोड अंधेरी पश्चिम येथे राहत होता. तो बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात बेहरा गावचा आहे. आरोपीला अंधेरी कोर्टात हजर केले असता त्याला 25 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

केवायसी करण्याची थाप देऊन लुबाडले- या गुन्ह्यातील तक्रारदार अन्नू कपूर यांना 29 सप्टेंबरला 10.45 वाजाताच्या दरम्यान मोबाईलवर कृष्णकुमार रेड्डी या नावाने आशिषने कॉल केला. तो HSBC बँकेच्या हेड ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगून त्याने अन्नू कपूर यांना त्यांच्या एचएसबीसी बँकेची केवायसी करणे बाकी असून केवायसी केली नाही तर त्यांचे बँकेचे खाते बंद होईल असे सांगून फिर्यादी यांच्याकडून बँकेचे खाते क्रमांक व ओटीपी देण्यास सांगितले. त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादक करून फिर्यादीकडून त्यांच्या बँकेचे खाते क्रमांक व ओटीपी प्राप्त करून फिर्यादी यांच्या एचएसबीसी बँक खात्यातून एकूण 4,36,000/- रू. इतकी रक्कम काढली. फसवणूक केली म्हणून अन्नू कपूर यांच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन सायबर पथकाने तात्काळ प्राप्त माहितीच्या आधारे व फिर्यादी यांच्या एचएसबीसी बँकेचे मॅनेजरशी संपर्क करून झालेल्या ट्रांजेक्शनची माहिती घेतली असता फसवणूक झालेली रक्कम ही कॅनरा बँक व युनियन बँकेच्या खात्यामध्ये वळते झाल्याचे समजल्याने सदरचे बँक खाते डेबिट फ्रिज करण्याकरिता CANARA व Union बँकेचे मॅनेजर/ नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन व ईमेलद्वारे पत्र व्यवहार करून Golden Hours मध्ये फिर्यादी यांची फसवणूक झालेल्या रक्कमे पैकी 3,08,000 रक्कम गोठवण्यासयश प्राप्त झाले असून सदरची रक्कम फिर्यादी यांना रिफंड करण्याकरिता बँकेची प्रक्रिया सुरू आहे.

आरोपीस अटक : आरोपीने गुन्ह्यात वापरलेले कॅनरा बँक खाते क्रमांक 110070009434 व युनियन बँक खाते क्रमांक 162812010000769 चे खातेधारकाची केवायसी बँकेमार्फत प्राप्त केली असता हे खाते हे आशिष जगदीश पासवान पत्ता:- गाव बसूहम पोस्ट:- बेहरा ता. जि. दरभंगा राज्य बिहार याच्या नावे असून खात्यास संलग्न असलेला मो. क्र 8002414709 हा बंद असल्याने त्याच्या मोबाईलचे IMEI क्रमांकाचे सीडीआर मोबाईल कंपनी मार्फत प्राप्त केले असता गुन्हयातील आरोपी व नमूद बँक खातेदार हा 7050437680 क्रमांक वापरत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्याचे लोकेशन तपासले. तो लल्लुभाई पार्क एसव्ही रोड अंधेरी पश्चिम मुंबई येथे असल्याने सदर ठिकाणी सायबर पथकासह जाऊन आरोपीचा शोध घेतला असता बँकेमार्फत प्राप्त झालेल्या अकाउंट ओपनिंग फॉर्ममधील फोटोतील इसम हा तोच असल्याची खात्री झाल्याने आणि तो मिळून आल्याने आरोपीस ताब्यात घेऊन त्यास पोलीस ठाण्यात आणून त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ दोन मोबाईल, आधार कार्ड व इलेक्शन कार्ड मिळून आले. या आरोपीस या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

जप्त मालमत्ता :
01) एक काळा रंगाचा जुना वापरता सॅमसंग कंपनीचा मोबाईल त्याचा IMEI no 355366094264260
355366094264268 त्यात एअरटेल कंपनीचा 7050437680 क्रमांकाचे सिम
2) एक गुलाबी रंगाचा नोकिया कंपनीचा मोबाईल त्याचा IMEI no 357728109753751
3) आशिष पासवान नावाचे आधार कार्ड क्र. 757417806559
4) आशिष पासवान नावाचे इलेक्शन कार्ड क्र. TNE1356340

Last Updated : Nov 23, 2022, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.