मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्टबरोबर अँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. अँटिजेन टेस्टमुळे चाचण्यांची संख्या वाढली असली तरी त्यामाध्यमातून कमी प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
मुंबईत कोरोना रुग्ण समोर यावेत म्हणून पालिकेने त्वरित रिपोर्ट मिळावा तसेच त्या रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून 7 जुलैपासून अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, मुंबईमधील टेस्टची संख्या वाढवण्यासाठी या टेस्ट रोज करण्यात येत असल्या तरी 28 जुलैला 6 टक्के, 11 सप्टेंबरला 6.6 टक्के, 10 सप्टेंबरला 6.7 टक्के, 9 सप्टेंबरला 7.3 टक्के रुग्ण या टेस्टद्वारे समोर आले आहे. इतर दिवशी या टेस्टच्या माध्यमातून फारच कमी रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
तर 15 सप्टेंबरला 13 हजार 528 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 13.5 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात 4.9 टक्के अँटीजन टेस्टद्वारे तर 8.7 टक्के आरटीपीसीआर टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. 14 सप्टेंबरला 11 हजार 426 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 11.4 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात 5 टक्के अँटीजन टेस्टद्वारे तर 6.4 टक्के आरटीपीसीआर टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत.
13 सप्टेंबरला 9 हजार 359 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 9.4 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात 1.9 टक्के अँटीजन टेस्टद्वारे तर 7.5 टक्के आरटीपीसीआर टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. 12 सप्टेंबरला 12 हजार 688 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 12.7 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात 5 टक्के अँटीजन टेस्टद्वारे तर 7.6 टक्के आरटीपीसीआर टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत.
11 सप्टेंबरला 15 हजार 827 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 15.8 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात 6.6 टक्के अँटीजेन टेस्टद्वारे तर 9.2 टक्के आरटीपीसीआर टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. 10 सप्टेंबरला 15 हजार 119 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 15.1 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात 6.7 टक्के अँटीजन टेस्टद्वारे तर 8.4 टक्के आरटीपीसीआर टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत.
- आकडेवारी काय म्हणते?
दिनांक | आकडेवारी (टक्क्यांमध्ये) |
1 सप्टेंबर | 1.1 |
2 सप्टेंबर | 2.2 |
3 सप्टेंबर | 2.5 |
4 सप्टेंबर | 2.9 |
5 सप्टेंबर | 4 |
6 सप्टेंबर | 1.6 |
7 सप्टेंबर | 3.8 |
8 सप्टेंबर | 4.7 |
9 सप्टेंबर | 7.3 |
10 सप्टेंबर | 6.7 |
11 सप्टेंबर | 6.6 |
12 सप्टेंबर | 5 |
13 सप्टेंबर | 1.9 |
14 सप्टेंबर | 5 |
15 सप्टेंबर | 4.9 |
- अँटिजेन टेस्टच्या अहवालावर प्रश्नचिन्ह -
मुंबईत 'चेस द वायरस' अभियानांतर्गत अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. अँटीजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेला रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह येत आहे. यामुळे अँटीजन टेस्टच्या अहवालावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्वत: अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे.