ETV Bharat / state

Opposition Alliance Meeting : भाजप विरोधी आघाडीच्या इंडियाची 25 व 26 ऑगस्टला मुंबईत बैठक

केंद्रातील भाजप भाजप सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी. देशातील भाजपा विरोधातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली आहे. इंडिया असे या आघाडीचे नामकरण करण्यात आले आहे त्यांची बैठक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी मुंबईत होत आहे. (Opposition Alliance Meeting )

Opposition Alliance Meeting
विरोधी आघाडीची बैठक
author img

By

Published : Jul 28, 2023, 1:05 PM IST

मुंबई : बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स - इंडिया असे नाव देण्यात आले. इंडियाची ही तिसरी बैठक आहे. जी मुंबई येथे होणार आहे. या बैठकीचे आयोजन उद्धव ठाकरे गट, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पटना आणि बंगळुरू येथे या आघाडीच्या दोन बैठका झाल्या यात केंद्रातील भाजपा विरोधामध्ये एकजुटीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या आघाडीच्या बैठकांना देशातील भाजपा विरोधातील 26 पक्षांनी सहभाग नोंदवला.

काॅंग्रेस नेते शरद पवारांना भेटणार : बैठकीच्या निमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. इंडियाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा होणार आहे. त्यासोबत पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडी संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची पुढील रणनीती काय असली पाहिजे यावर देखील चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतआहे.

शिवसेनेची आयोजनाची तयारी : बंगळुरू येथील इंडियाच्या बैठकीत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. कोणी आयोजन करावे हे घटक पक्षाचे मत आहे. आम्हाला जर जबाबदारी दिली तर आम्हाला आनंद होईल. कोणालाही संकोच न बाळगता आनंदाने सर्वांचा पाहूनचार करू. आपण पाहिला असेल गेल्या दिवसात मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडले होत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे देखील सहकार्य केले होते आम्हला आयोजनाची संधी दिली तर चांगले होईल असे मत ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केले आहे.

आघाडीचा चेहरा ठरणार का : आमची इच्छा आहे कि इंडिया बैठकीचे आयोजन काँग्रेस पक्षाला करू दयावे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आमची बैठक आहे. त्यात याबाबत निर्णय होईल अशी माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. इंडियाची ही तिसरी बैठक मुंबई दोन दिवस चालणार आहे. महाआघाडीचे नामकरण झाले. मात्र इंडियाचा चेहरा कोण असेल यावर एकमत झालेले नाहीये. त्यामुळे मुंबईमधील दोन दिवसीय बैठकीत इंडियाचा चेहऱ्याची घोषणा होते का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.