ETV Bharat / state

Anil Deshmukh Release : अनिल देशमुख यांच्या तुरुंगातून  सुटकेच्या आदेशावर शिक्कामोर्तब, मात्र नागपूरच्या अधिवेशनाला मुकणार

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा ( Anil Deshmukh bail by high court ) दिलासा दिला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या जामीनवरील स्थगिती वाढीव देणारा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे अनिल देशमुख यांचा कारागृहातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मुंबईतून तीन महिने तरी बाहेर जाता ( not be allowed to leave Mumbai ) येणार नाही अशी अट मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्ती मध्ये देण्यात ( Anil Deshmukh not permission leave Mumbai ) आली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला देखील अनिल देशमुख हजर राहू शकणार नाहीत. दरम्यान आज दुपारी सुटकेच्या आदेशावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

author img

By

Published : Dec 28, 2022, 7:46 AM IST

Updated : Dec 28, 2022, 3:24 PM IST

Anil Deshmukh release from jail
अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका

मुंबई : अनिल देशमुख गेल्या 13 महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर उद्या कारागृहातून सुटणार असल्याने अनिल देशमुख यांच्या मतदारसंघ असलेल्या नागपूर विभागामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर नागपूर मध्ये केव्हा दाखल होतात याची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणखी काही दिवस अनिल देशमुख यांची नागपूरमध्ये येण्यासंदर्भात वाट पहावी लागणार आहे. अनिल देशमुख यांना तीन महिने तरी मुंबई सोडता येणार नसल्याची ( Anil Deshmukh not permission leave Mumbai ) माहिती अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून मिळाली आहे. दरम्यान आज दुपारी सुटकेच्या आदेशावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

उच्च न्यायालयाने यापूर्वी 12 डिसेंबरला देशमुख यांना सीबीआय खटल्यात जामीन मंजूर केला ( Anil Deshmukh bail by high court ) होता. मात्र सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची भूमिका घेत जामीनाला 10 दिवस स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत जामिनाला स्थगिती दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाला नाताळची सुट्टी असल्याने सीबीआयच्या विनंतीवरुन स्थगितीची मुदत 27 डिसेंबरपर्यंत ( Anil Deshmukh bail conditions ) वाढविली होती.

देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयाने देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती वाढविण्यास न्यायालयाने नकार दिला. तातडीची सुनावणी घेण्यास सुट्टीमुळे अडचणी येत असल्याने सीबीआयने पुन्हा स्थगितीची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. ही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे अखेर ( Anil Deshmukh release from jail today ) देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांना ईडीच्या खटल्यातही जामीन मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेले आहेत. याप्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ईडीचाही ससेमिरा देशमुख यांच्या मागे लागला होता. या दोन्ही यंत्रणांनी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. अखेर आता या दोन्ही प्रकरणांमध्ये ईडीने देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.

अनिल देशमुख आज बाहेर येणार असल्याने नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला ते जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. मात्र न्यायालयाने जमीन देताना टाकलेल्या एका अटीमुळे ते हिवाळी अधिवेशनाला मुकणार आहेत. देशमुखांना जामीन देताना त्यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळाल्यानंतरही अधिवशेनाला जाता येणार नाही.

अनिल देशमुख अटकेचे काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

Last Updated : Dec 28, 2022, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.