ETV Bharat / state

भाजपा सरकार म्हणजे ‘नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग’- अनंत गाडगीळ

जीडीपीमध्ये झालेली घट, शेजारील राष्ट्रांशी बिघडलेले संबंध यावरुन काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. भाजपा सरकार म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे. भारतातील विमानसेवा देखील बंद करण्यात उशीर करण्यात आला, असे गाडगीळ यांनी म्हटले.

anant gadgil
अनंत गाडगीळ
author img

By

Published : Sep 2, 2020, 3:52 PM IST

मुंबई- स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा देशाचा विकासदर २४ टक्क्यांनी घसरला आहे. एकीकडे सर्वात अपयशी अर्थमंत्री असे संदेश (मेसेज) सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. दुसरीकडे गंभीर व धक्कादायक बाबींवर काही प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक गप्प आहेत. अर्थव्यवस्था सावरायची प्राथमिक जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्र्यांची असल्यामुळे या परीक्षेत अर्थमंत्री ‘नापास’ झाल्याचे सिद्ध झाले आहे. संघाच्या “वर्गात" वाढलेल्यांनी निदान या परीक्षांची तरी “नीट" तयारी करावी. भाजपा सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग' असल्याची उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

भारताचा आत्तापर्यंत मित्र असलेला नेपाळ हळूहळू चीनच्या बाजूला जात आहे. पूर्वेकडे भुतान व बांगलादेशाला चीन चुचकारु लागला आहे. दक्षिणेकडे श्रीलंकेत चिनी नौदलाचा तळ उभारला जात आहे. पश्चिमेकडे इराणने अब्जावधी रुपयांच्या रेल्वेमार्गाचे काम भारताकडून काढून घेत चीनला दिले. यावरुन परराष्ट्रमंत्री शेजारील मित्र राष्ट्रांसोबत योग्य धोरण राबवण्यात अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होते, अशी टीका गाडगीळ यांनी केली.

हेही वाचा-श्रीमंत लोक लक्षणं नसतानाही आयसीयू बेड अडवतात - राजेश टोपे

हेरगिरी करताना अमेरिकेत पकडलेल्या अ‌ॅलन हो या चिनी हेराला ज्या ‘बँक ऑफ चायना’ मधील एका गुप्त खात्यातून पैसे पूरविल्याचा अहवाल एफबीआयने दिला आहे. त्याच बँकेला मुंबईतील बीकेसीमध्ये कार्यालय उघडण्यास परवानगी केंद्रीय गृह खात्याकडून दिली जाते, यामधून गृहमंत्रालयाचा बेजबाबदारपणा दिसून येतो. सिंगापूर, न्यूझीलंड, व्हिएतनामपासून दुबईपर्यंत अनेक राष्ट्रांनी जानेवारीत त्यांच्या देशातील विमानतळे बंद केली. भारतात ट्रम्प यांच्या गुजरातमधील मेळाव्यासाठी मार्चअखेर पर्यंत भारताने विमानतळ उघडे ठेवले.

१ जानेवारी ते १५ मार्च या काळात १० लाख प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले असता केवळ १९ टक्के प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यामध्ये पूर्वेकडून आलेल्या नागरिकांचीच तपासणी झाली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ८० हजारांवर पोहोचली आहे. राज्यांशी योग्य समन्वय न साधल्याचे हे दुष्परिणाम आहेत. हवाई वाहतूकमंत्री व आरोग्यमंत्री दोघेही निष्प्रभ ठरल्याची टीका अनंत गाडगीळ यांनी केली.

जीडीपी घसरणीत उच्चांक, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत उच्चांक, थोडक्यात अर्थ, आरोग्य, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह अशा सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारे केंद्रातील भाजपा सरकार म्हणजे “नापास” विद्यार्थ्यांचा "वर्ग" झाला आहे, अशी उपरोधिक व खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.