ETV Bharat / state

Amruta Fadnavis extortion Case: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात ७९३ पानांचे चार्जजीट न्यायालयात दाखल, धक्कादायक माहिती समोर - अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण

मुंबई पोलिसांनी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणात विशेष न्यायालयासमोर ७९३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अमृता फडणवीस आणि जयसिंघानी यांच्यातील अनेक कथित दूरध्वनी चॅटची माहिती देण्यात आली आहे.

Amruta Fadnavis extortion Case
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण
author img

By

Published : Jun 6, 2023, 11:12 AM IST

मुंबई: अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि खंडणीचा प्रयत्न प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुकींची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अटक होईल. या अटकेतून मोठी रक्क कमवू शकतो, असे संशयित बुकी अनिल जयसिंघानी यांच्या मुलीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सांगितले होते.

आरोपपत्रात अनिल जयसिंघानी, त्यांची मुलगी अनिक्षा, तिचा चुलत भाऊ निर्मल यांच्यावर अमृता फडणवीस यांच्याकडून लाच मागणे आणि खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्रात कथित व्हॉट्सअॅप चॅट्स आणि मेसेजचे स्क्रीनशॉट देण्यात आले आहेत. फेब्रुवारीमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. अनिक्षा जयसिंगनी आणि निर्मल सध्या जामिनावर बाहेर आहेत, तर अनिल जयसिंगनी न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहेत. अनिल जयसिंगानीवर त्याच्यावर मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये 14 गुन्हे दाखल आहेत.

काय म्हटले आहे कथित चॅटमध्ये?

  • दक्षिण मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशनने 20 फेब्रुवारी रोजी जयसिंघानींविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. एका कथित चॅटमध्ये, अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस घटस्फोट देऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली होती. कारण 2019 पासून त्यांचे संबंध चांगले चालले नाहीत, असे आरोपत्रातील चॅटमध्ये म्हटले आहे.
  • अंकिशा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांना काही व्हिडिओ आणि ऑडिओ लीक करण्याची धमकी दिली. त्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, दीदीजी, माझ्या वडिलांना माहित आहे की तुम्ही आणि देवेंद्र सर त्यांच्या विरोधात पोलिसांचा वापर करणार आहात. त्यानुसार पोलीस व्हिडिओ बनावट असल्याचा दावा करू शकतील. माझे वडील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नियमित संपर्कात आहेत. ते सर्व व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग वडील ठाकरे व पवारांना देतील. त्यानंतर ते व्हिडिओ पवार व ठाकरे आणि मोदींना देतील, आरोपपत्रात म्हटले आहे.
  • एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनिक्षा जयसिंघानी यांनी 1 कोटी रुपयांच्या चलनी नोटांनी भरलेल्या बॅगचा व्हिडिओ शूट केला होता. अमृता यांनी तिचा नंबर ब्लॉक केल्यानंतर तिने व्हिडिओ शूट केलेली क्लिप दुसऱ्या मोबाईल नंबरवरून अमृता फडणवीस यांना पाठवली होती.
  • या व्हिडिओ क्लिपमुळे मोठा गंभीर राजकीय मुद्दा होऊ शकतो. त्याचा देशातील सर्व माध्यमांकडून वापर झाल्यानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशी भीती अनिक्षाने दाखविली. तसेच फडणवीस यांची कारकीर्दही संपेल, असाही मेसेज अमृता फडणवीसांना पाठविला.
  • अनिल जयसिंगनी यांना अनेक खोट्या प्रकरणातून सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंतीदेखील अनिक्षाने अमृता फडणवीस यांना केली आहे.

हेही वाचा

  1. Amrita Fadnavis Bribary News : अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल
  2. Amruta Fadnavis Blackmail Case: अमृता फडणवीस लाच प्रकरणातील जयसिंघानीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; मध्यप्रदेश, गोव्यासह गुजरात पोलिसांचा लकडा

Anil Jaisinghani Bail : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.