ETV Bharat / state

Ambadas Danve on Maratha Reservation : मुख्यमंत्री दिल्लीत जातात उपमुख्यमंत्री दहीहंड्या फोडतात, मात्र...; दानवेंचा सरकारवर घणाघात

Ambadas Danve on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीयं. मात्र या बैठकीस सरकारने शिवसेना पक्षाला अधिकृतपणे बोलावलं नसल्याने विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर घणाघाती टिका केलीय. राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातात, दुसरे उपमुख्यमंत्री कोल्हापूरात सभा घेतात तर दुसरे उपमुख्यमंत्री दहीहंडी फोडतात. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसुन केवळ राजकारण करायच आहे, अशा शब्दांत दानवेंनी सरकारवर टीका केलीय.

दानवेंचा सरकारवर घणाघात
Ambadas Danve on Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 5:57 PM IST

आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये

मुंबई Ambadas Danve on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटलांच उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून सरकारने मराठा आरक्षणाबाबत तातडीची उपाययोजना करण्यासाठी आज सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावलीय. यासाठी अनेक छोट्या-मोठ्या पक्षांना निमंत्रण दिलयं. या बैठकीस सरकारने विरोधी पक्षनेता म्हणून मला बोलावलं असून शिवसेना पक्षाला अधिकृतपणे बोलावलं नाही. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, तर राजकारण करायचं आहे असा आरोप विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलाय. मुंबईतील आपल्या सरकारी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेला अधिकृत बोलावलं नाही : यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी अनेक छोट्या-मोठ्या पक्षांना सरकारनं आमंत्रण दिलंय, परंतु शिवसेना पक्षाला अधिकृत आमंत्रण दिलेलं नाही. मी विरोधी पक्ष नेता असल्याने मला या बैठकीसाठी बोलावलं आहे. याबाबत विभागच्या सचिवांकडे आक्षेप नोंदवला असून यातून सरकार काय साधू इच्छित आहे, हेच समजत नसल्याचं दानवे म्हणाले. तसेच मराठा समाजासोबत ओबीसी, धनगर समाज आरक्षणाबाबत सुद्धा निर्णय घेतला पाहिजे. एकाला एक न्याय व दुसऱ्यावर अन्याय होऊ नये. मराठा अरक्षणासाठी जी समिती नेमलीयं, या समितीचे मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्ष आहेत. मात्र आजच्या बैठकीत त्यांचं नाव कुठेच नाही. म्हणून त्यांना मंत्री म्हणून बोलवलं आहे की समितीच अध्यक्ष म्हणून बोलावलं? असा प्रश्नही दानवेंनी उपस्थित केलायं.

आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष : अंबादास दानवे पुढे म्हणाले की, सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की राजकारण करायचंय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बैठकीला ६० संघटनांना बोलावलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातात, दुसरे उपमुख्यमंत्री कोल्हापूरात सभा घेतात तर दुसरे उपमुख्यमंत्री दहीहंडी फोडतात. मात्र, उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना भेटण्यस या तिन्ही मंत्र्यांना वेळ नाही, अशा शब्दांत दानवेंनी सरकारवर घणाघाती टिका केलीयं. या बैठकांच आयोजन करताना ते राजकारण करतात. अनेक गावांत अनेक तरुण उपोषणाला बसले आहेत. आंदोलनात ३०० लोक जखमी झाले आहेत. त्याच्याकडे ढुंकूनही पाहायला सरकारला वेळ नाही. एक व्यक्ती उपोषण करतो, परंतु त्यांची भेट घेण्यासाठी सरकारने अधिकृत प्रतिनिधीच नेमला नाही. सरकार म्हणून कोणी मंत्री तिकडे फिरकले नाहीत. या आंदोलनाच्या तीव्रतेची जाणीव सरकारला नाही आहे, असा आरोपही दानवे यांनी केलायं.

फक्त स्वतःच मार्केटिंग, शो बाजी करण्यासाठी अमित शहा येत असून, त्यांच्या दौऱ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तोच पैसा मराठवाडा विकासासाठी, हितासाठी देता आला असता. मराठवाडा विकासाच्या नावावर पैशाची उधळपट्टी सुरू असून याचा मी तीव्र निषेध करतो- विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

अमित शाह शो बाजी करण्यासाठी मराठवाड्यात : दानवे पुढे म्हणाले की, सरकार मराठाला आरक्षण देणार असेल तर त्यांना शुभेच्छा. पण हे आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. ही शिवसेनेची भूमिका आहे. केंद्रात सरकार भाजपाचे आहे. आरक्षण देताना मर्यादा पुढे नेली तर त्याला पाठिंबा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ५० टक्के आरक्षण वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्षे झाली म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संभाजीनगरात (Amit Shaha in Sambhajinagar) येत आहेत. परंतु सरकारने इतक्या वर्षात मराठवाडा विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. मराठवाड्याच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले, असा आरोप दानवे यांनी केलाय.

हेही वाचा :

  1. Ambadas Danve Criticized Mahayuti : शिंदे, पवार गटावर गद्दारीचा शिक्का - अंबादास दानवे
  2. Maratha Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला; सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, तोडगा निघणार?
  3. Maratha Reservation : मराठा-ओबीसी वाद पेटणार; 11 सप्टेंबरपासून ओबीसी समाजाचं आमरण उपोषण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.