ETV Bharat / state

Mumbai Bomb Blast Case : मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast Case) चार आरोपींना (four accused) गुजरात एटीएसने (Gujarat ATS) पकडल्यानंतर सीबीआयने त्यांचा ताबा घेतला. विशेष सीबीआय कोर्टाने आज त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी (remanded in judicial custody) केली आहे. या चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईत 1993 मध्ये 12 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते.

remanded in judicial custody
चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी
author img

By

Published : May 30, 2022, 7:16 PM IST

मुंबई: मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींचा गुजरात एटीएस आणि सीबीआयचे पथक शोध घेत होते. गुजरात एटीएसने चार आरोपींना गेल्या आठवड्यात अहमदाबादमधून पकडले. सोमवारी या आरोपींची न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता हे प्रकरण गुजरात एटीएसने सीबीआयकडे वर्ग केले आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील हे आरोपी कायद्यापासून दूर पळत होते.

गेल्या आठवड्यात गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने या चौघांना अटक केली. या चार आरोपींच्या शोधात केवळ मुंबई पोलीस, सीबीआय किंवा गुजरात एटीएसच नाही तर जगातील अनेक सुरक्षा यंत्रणा या आरोपींचा शोध घेत होत्या. या चारही आरोपींविरुद्ध इंटरपोल आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता. या स्फोटांमध्ये 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी 189 जणांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. 2006 मध्ये मुंबई न्यायालयाने यातील 100 आरोपींना दोषी ठरवले होते. हे आरोपी दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या चौघांची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा : नांदेडात खळबळ : माजी मंत्र्यांच्या घरात घुसला बंदूकधारी तरुण, केली खंडणीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.