ETV Bharat / state

साखर कारखान्यांच्या लिलावात अजित पवारांच्या कुटुंबीयांना फायदा; ईडीची माहिती - अजित पवार कुटुंब ईडी चौकशी न्यूज

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य सहकारी बँकेने लिलाव केलेला साखर कारखाना अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्याने विकत घेतल्याचे ईडीने केलेल्या चौकशीमध्ये समोर आले आहे.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Nov 2, 2020, 3:00 PM IST

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील एका सदस्याने साखर कारखाना विकत घेतल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून लिलावात काढण्यात आलेला हा साखर कारखाना पवार कुटुंबातील एका व्यक्तीने अतिशय स्वस्तात विकत घेतला असल्याचे समोर आले आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

शिखर बँकेने दिले होते 79 कोटींचे कर्ज -

2010मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकपदी अजित पवार होते. तेव्हा या बँकेकडून 'जरंडेश्वर-1' या साखर कारखान्याला 79 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. पुढे हे कर्ज बुडीत निघाले. त्यामुळे शिखर बँकेकडून हा कारखाना लिलावात काढण्यात आला. या लिलावादरम्यान गुरू कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने बोली लावत हा कारखाना विकत घेतला होता.

'जय अ‌ॅग्रोटेक कंपनी'च्या संचालकपदावर आहेत सुनेत्रा पवार -

जरंडेश्वर-1 या साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू असताना जरंडेश्वर-2 नावाची कंपनीसुद्धा अस्तित्वात होती. त्याच्या संचालकपदावर अजित पवार यांच्या कुटुंबातील एक सदस्य असल्याचे समोर आले होते. जरंडेश्वर-2 कंपनीला 20 कोटी रुपयांची रक्कम जय अ‌ॅग्रोटेक या कंपनीकडून मिळाली होती. जय अ‌ॅग्रोटेक कंपनीच्या संचालकपदी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आहेत. याबरोबरच गुरू कमोडिटी नावाच्या कंपनीला जरंडेश्वर-2 या कंपनीकडून पैसे मिळाल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अजित पवारांच्या कुटुंबाला झाला फायदा -

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून लिलावात काढण्यात आलेल्या जरंडेश्वर-1 या साखर कारखान्याचा लिलाव अगदी स्वस्तात करण्यात आला होता. याचा फायदा अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांना झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

रोहित पवार यांच्या कंपनीनेही घेतला साखर कारखाना -

ईडी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून अशाच प्रकारे कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. यामध्ये दोन कंपन्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. यामध्ये शरद पवारांचे पुतणे रोहित पवार यांच्या बारामती अ‌ॅग्रो या कंपनीचा समावेश होता. त्याच कंपनीने कन्नड साखर कारखाना विकत घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.