ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीत मोठा भूकंप: अजित पवारांचा एनडीएला पाठिंबा, 9 नेत्यांना मिळाली मंत्रिपदे

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 2, 2023, 2:08 PM IST

Updated : Jul 2, 2023, 10:46 PM IST

22:41 July 02

राष्ट्रवादीत मोठा भूकंप: अजित पवारांचा एनडीएला पाठिंबा

रविवारी दुपारी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीसोब बंड करून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत घरोबा केला आहे. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तर, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवार यांचे स्वागत केले आहे.

मुंबई - मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि आपल्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल अशी आशा शिवसेनेच्या अनेक नेत्यांना होती. वर्षभर लांबलेला विस्तार अखेर आज झाला, पण या विस्तारात शिवसेनेच्या एकाही नेत्याला मंत्रिपद मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला एकाच झटक्यात नऊ मंत्रिपदे गेल्याने भविष्यात फार काही हाती लागेल अशी अपेक्षाही संपल्याने शिवसेनेमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट - एकनाथ शिंदेंच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी काही आमदारांना हाताशी घेत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी या पाठिंब्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे निश्चित झाले.

अजित पवारांना कोणाचा पाठिंबा - राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. शरद पवार यांनीही याविरोधात दंड ठोठावत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याची मला अजिबात चिंता नाही. कोणी कितीही पक्षावर दावा केला तरी जनता माझ्यासोब असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांसोबत असलेले आमदार - छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, किरण लहमाटे, निलेश लंके, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेनके, सुनिल टिंगरे, इंद्रनील नाईक, अशोक पवार, अण्णा बनसोडे, सरोज अहिरे, बबनदादा शिंदे, यशवंत माने, नरहरी झिरवळ, दत्ता भरणे, शेखर निकम, दीपक चव्हाण, राजेंद्र कारेमोरे, नितीन पवार, मनोहर चंद्रिकापुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, सुनील शेळके, दिलीप मोहिते अशी अजित पवार यांना पाठिंबा असलेल्या आमदारांची नावे आहेत. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही नावे देण्यात आली आहे. याबाबत अजून स्पष्टता मिळालेली नाही.

जयंत पाटलांची प्रतिक्रिया - कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे काही आमदारांनी म्हटले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पक्षाच्या मान्यतेशिवाय सत्ता पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याचे पाटील यांनी म्हटले.

नवीन विरोधी पक्षनेते - अजित पवारांकडे उप मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. अजित पवारांनी बंड केल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नेत्यांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.

20:59 July 02

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; शपथ घेतलेल्या नेत्यांच्या फोटोला फासले काळे

रष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी बंडखोरी करत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतलेल्या नऊ नेत्यांच्या फोटोला काळे फासले आहे.

19:42 July 02

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत आमची आघाडी राहणार - काँग्रेस

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत आमची आघाडी राहणार आहे. आजच्या बंडाचा आमच्या आघाडीवर काहीच परिणाम होणार नसल्याचे विधान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे.

17:19 July 02

घड्याळ चिन्हाला काहीच होणार नाही - शरद पवार

बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी नावाला आणि चन्हाला काहीच होणार नसल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

17:06 July 02

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या वक्तव्याचा परिणाम झाला - शरद पवार

राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांच्या मागे यंत्रणेचा ससेमिरा होता. त्यामुळे अनेक नेते दबावात होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँर्गेसच्या 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा विषय आपल्या भाषणात केला. त्यामुळे अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा किती सहभाग यात असेल याबाबत सांगू शकत नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

16:46 July 02

जे घ़डले त्याची मला चिंता नाही - शरद पवार

जे घ़डले त्याची मला चिंता नाही. तसेच येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

16:10 July 02

पुढील निवडणुका मोदींसोबत लढणार - अजित पवार

येणाऱ्या सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

15:51 July 02

शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला - अजित पवार

15:41 July 02

राष्ट्रवादीचे जवळपास 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत

राष्ट्रवादीचे जवळपास 40 आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच विधानपरिषदेतील सहा आमदार हे अजित पवार यांच्यसोबत असल्याची माहिती आहे.

15:30 July 02

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या सर्व घ़डामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

15:13 July 02

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईकडे रवाना

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईकडे रवाना झाले आहेत.

15:12 July 02

15:07 July 02

राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

राष्ट्रवादीच्या एकूण नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देखील सहभागी आहेत. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

14:57 July 02

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष राजभवनात उपस्थित

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे राजभवनात उपस्थित आहेत. त्यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

14:53 July 02

अदिती तटकरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादीचे नेत्या अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

14:46 July 02

धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

14:45 July 02

नहसन मुश्रीफांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफांनी मंत्रिपदाची शपथ राजभवनात घेतली आहे.

14:43 July 02

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

14:40 July 02

छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

14:35 July 02

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

14:22 July 02

राजभवनात जोरदार तयारी

अजित पवार हे थोड्याच वेळात राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अशी शक्यता आहे. त्यासाठी राजभवनात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे विविध नेते दाखल झाले आहेत.

13:58 July 02

अजित पवार हे राजभवनात दाखल झाले आहेत.

  • Ajit Pawar and other NCP MLAs have come here. An Oath ceremony will be held here, says Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule pic.twitter.com/Tn2XEOuXDW

    — ANI (@ANI) July 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - विरोधी पक्षनेते अजित पवार हे सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत मोठा भूकंप होण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांना अजित पवार यांनी अल्टिमेटम दिला होता. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुरा दिला नाही. त्यामुळे अजित पवार हे नाराज होते अशी माहिती मिळत होती. त्यात आता राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jul 2, 2023, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.