ETV Bharat / state

श्वास गुदमरतोय! राज्यातील नऊ शहरांत हवा प्रदूषणाची पातळी वाढली - mumbai air pollution levels news

राज्यातील नऊ शहरांतील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला आहे. रस्ते, मेट्रो, इमारती आदी बांधकामे, भराव, कचरा जाळणे, शेतीच्या कामांमुळे राज्यात धुळीचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम शहरातील हवा प्रदूषणावर झाला आहे.

air-pollution-levels-rose-in-nine-cities-in-maharashtra
श्वास गुदमरतोय! राज्यातील नऊ शहरांत हवा प्रदूषणाची पातळी वाढली
author img

By

Published : Mar 13, 2021, 7:00 AM IST

मुंबई - राज्यातील मागील तीन वर्षात हवा प्रदूषणाचा वेग वाढला आहे. मुंबई, ठाणे, पुणे यासह औरंगाबाद, जालना, चंद्रपूर, कोल्हापूर, लातूर, नागपूर या नऊ शहरांतील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला आहे. रस्ते, मेट्रो, इमारती आदी बांधकामे, भराव, कचरा जाळणे, शेतीच्या कामांमुळे राज्यात धुळीचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम शहरातील हवा प्रदूषणावर झाल्याचे प्रदूषण मंडळाने म्हटले आहे.

हवेचे प्रदूषण वाढले -

राष्ट्रीय स्वच्छ वायू कृती योजनेंतर्गत १० जानेवारी २०१९ रोजी देशभरातील १०२ शहरांमधील प्रदूषणाची पातळी दर्शवणारा अहवाल जाहीर करण्यात आला. त्यात १८ शहरांचा समावेश होता. या शहरांचा समावेश २०११-१५ नुसार राष्ट्रीय हवा गुणवत्ता मापदंड पूर्ण करू न शकलेल्या शहरांमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे प्रत्येक शहराला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यक्रम आखण्यास सांगण्यात आले. रेस्पिरेबल सस्पेंडेड पार्टीक्युलेट मॅटर म्हणजेच पीएम १० चे प्रमाण हवेत अधिक असल्याने प्रदूषण वाढल्याचे दिसत आहे.

आरोग्यावर परिणाम -

प्रदूषण वाढल्याने मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हवेतील अनेक घातक कण फुफ्फुसात किंवा रक्तात मिसळून आरोग्याच्या गंभीर समस्या उद्धवू शकतात. श्वासनाचे विकार, धुळीमुळे त्वचेवर लाल पुरळ, चट्टे येणे, अंगाला खाज आदी व्याधी होण्याची शक्यता आहे.

हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी मॉनेटरिंग स्टेशन -

राज्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांंतर्गत काही ठिकाणी हवेतील प्रदूषण मोजणारे संयंत्र लावण्यात आली आहे. ठाणे शहरात दोन औद्योगिक आणि एक निवासी क्षेत्रात, असे तीन देखरेख संयंत्रे आहेत. हे कायमस्वरूपी नसून आठवड्यातून दिवस एओएक्स, सल्फर, आरएसपीएमचे निरीक्षण केले जाते. सध्या चार स्थानकांपैकी एक सिएक्युएमसम आहे. त्यापैकी वाशीमधील एक स्टेशन बंद असल्याचे नमूद केले आहे.

५ नवीन सिएक्युएमएस उभारणार -

एनसीपीएअंतर्गत एमपीसीबीने स्वच्छ वायू कृती योजना राबवण्यासाठी सर्व महापालिकांना ३०.६५ कोटी रुपयांचा निधी देणार आहे. मुंबईत १५ तर नागपूरमध्ये एक सिएक्युएमएस आहेत. मुंबईतील १५ सिएक्यूएमएस व्यतिरिक्त चेंबूर येथील माहूल गाव, देवनार-शिवाजी नगर, घाटकोपर-पंतनगर, कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथे नविन ५ स्टेशन उभारले जाणार आहेत. मुंबईला ९.५ कोटी, पुणे शहराला ४.४५ कोटी, नवी मुंबईला ५.५८ कोटी आणि नागपूरला ५.८५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच नवी मुंबईतील कळंबोली येथे सिएक्युएमएस बसण्यास परवानगी देण्यात आली आहे.

क्लिनर ॲक्शन प्लॅन बनवणे गरजेचे -

जगामध्ये असलेल्या १२२ प्रदूषित शहरांपैकी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकूण १९ शहर हे प्रदूषित आहेत, असे हे सेंट्रल पॉल्युशन कंत्रोल बोर्ड जाहीर केले. महाराष्ट्र हा प्रदूषणाचा अभ्यास करत असताना, प्रत्येक शहरातले प्रदूषणाचे स्रोत वेगवेगळ्या स्वरूपाचे असल्याचे आहेत. विशेषत विदर्भामध्ये चंद्रपूर आणि नागपूर शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण हे प्रामुख्याने उद्योगधंदे, इंडस्ट्री आणि थर्मल पावरप्लांट यामुळे प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर मुंबईमध्ये इंडस्ट्री ३३% प्रदूषण आहे, अशा स्वरूपाचा मुंबईचा क्लीन एअर एक्शन प्लॅन बनवला गेला आहे. त्याप्रमाणे घोषित केले आहे. टाटा पॉवर स्टेशनचे प्रदूषणाचे प्रमाण २२ टक्के आहे. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट हा मेजर घटक आहे. प्रदूषणामध्ये भर पडत आहे. ट्रान्सपोर्ट, कन्स्ट्रक्शन आणि वेस्ट या सर्व क्षेत्रांमधून येणारे प्रदूषण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रदूषित शहर करण्यामध्ये कारणीभूत आहेत. त्यासाठी महाराष्ट्रमध्ये क्लिनयर ॲक्शन प्लॅन बनवणे गरजेचे आहे. रिजनल प्लॅन बनवल्यानंतर ठोस स्वरूपाचा आराखडा तयार होऊ शकेल, असे वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशभट्ट यांनी सांगितले.

हेही वाचा - मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमधून बाहेर काढणाऱ्याचा एटीएसने घेतला जवाब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.