ETV Bharat / state

Air Pollution In Mumbai : उपनगरांच्या घशाला कोरड; तर रस्ते धुण्यासाठी पालिका वापरणार 121 टँकर पाणी

Air Pollution In Mumbai : गेल्या चार वर्षांत मुंबईतील वायू प्रदूषणात (Air Pollution) वाढ झाली आहे. हिवाळ्यात हवेची गुणवत्ता सतत खालावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने 650 किलोमीटर लांबीचे रस्ते, वरदळीचे फुटपाथ धुवून काढण्याचे नियोजन केले आहे.

Mumbai Air Pollution
मुंबई वायू प्रदूषण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 8:00 PM IST

मुंबई Air Pollution In Mumbai : मुंबईतील वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने सक्रिय पाऊले उचलावीत अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह (Iqbal Singh Chahal) यांच्या निर्देशानुसार सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये युद्धपातळीवर ही कामे सुरू आहेत. शहरातील रस्ते व फुटपाथवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेच्यावतीनं 'अँटी फॉग मशीन' तैनात करण्यात आली आहे. संपूर्ण मुंबई महानगर मिळून 650 किलोमीटर लांबीचे रस्ते नियमित स्वच्छ करून धुवून काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पाण्याचे 121 टँकर (121 Tankers For Wash Main Roads) व इतर यंत्र आणि मनुष्यबळ पालिकेकडून नेमण्यात आले आहेत.

नागरिकांनी व्यक्त केली नाराजी : मुंबईतील प्रदूषण (Air Pollution) नियंत्रणासाठी पालिकेने केलेला हा निर्णय मात्र, आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबई पूर्ण आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागांमध्ये आजही पाण्याची टंचाई आहे. यातील गोवंडी, मानखुर्द, सांताक्रुझ, अंधेरी या भागातील काही वस्त्यांमध्ये कधी दूषित पाण्याचा पुरवठा होतो. तर, कधी एक ते दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करतात. अशातच पालिकेने दररोज तब्बल 121 टँकर पाणी केवळ रस्ते धुण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

पिण्याच्या पाण्याची नासाडी : यासंदर्भात पालिकेची बाजू जाणून घेण्यासाठी पालिकेला संपर्क साधण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाण्याच्या टँकरची संख्या, प्रत्येक टँकर फेऱ्यांची वारंवारता आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याच्या सर्वात जवळचा स्त्रोत यांचा समावेश तपशीलवार आराखड्यात करण्यात येत आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा त्याचप्रमाणे विभागातील पाण्याचे स्थानिक स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करून, रस्ते व फुटपाथ धुतल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही. याची काळजी घेतली जात असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्ते व फुटपाथ धुण्याचे काम : हवेतील वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना म्हणून मुंबईतील 650 किलोमीटर लांबीचे रस्ते, वरदळीचे फुटपाथ स्वच्छ करून धुवून काढण्याची कामे आता मुंबई महानगरपालिका वेगाने करणार आहे. त्यासाठी 121 पाण्याचे टँकर व इतर यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वर्दळीच्या ठिकाणी पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान, रस्ते धुण्याची कामे करण्यात येत आहेत. काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा संध्याकाळच्या वेळेत ही काम केली जात आहेत. रस्ते व फुटपाथ धुण्याचे काम तीन ते चार तासात पूर्ण करण्याचे निर्देश देखील या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी स्वच्छता करणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. या कामात पालिकेला एमएमआरडीए, मेट्रो, म्हाडा आणि इतर संबंधित संस्थांसोबत समन्वय साधला जात आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Air Quality Index : मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ; आजार बळवण्याची शक्यता, 'अशी' घ्या काळजी
  2. Mumbai News: मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय; प्रदूषणामुळे 5 वर्षात तब्बल ६ हजार ७५७ मुंबईकरांचा मृत्यू
  3. Air Pollution In Mumbai : मुंबईतील हवेचा दर्जा घसरल्यानं सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.