ETV Bharat / state

भारतातील वीर जवानांसाठी 'देव'ची अनोखी सलामी

उत्तर प्रदेश राज्यातील आग्राजवळच्या खंडोली येथे राहणाऱ्या देव पराशर या पाचवीत शिकणाऱ्या मुलाने देशाचे रक्षण करताना तसेच 26/11 च्या हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांना त्यांच्या घरी जाऊन सलामी देण्याचे काम करत आहे.

देव पराशर
देव पराशर
author img

By

Published : Jan 4, 2020, 8:13 AM IST

मुंबई - देशासाठी विविध भागात वीरगती प्राप्त झालेल्या तब्बल दीड हजारांहून अधिक वीर जवानांना त्यांच्या गावी जाऊन सलामी देण्याचा एक नवा संकल्प उत्तर प्रदेशातील आग्रा जवळच्या खंडोली गावातील देव पराशर या पाचवीतील चिमुकल्याने केला आहे. देशातील वीर जवानांना सलामी देण्यासाठी जाताने तो खास सैनिकांचा वेश परिधान करतो.

भारतातील वीर जवानांसाठी 'देव'ची अनोखी सलामी

देव पराशर हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेतो. त्याला मोठे होऊन सैन्यात वैद्यकीय सेवा करायची आहे. एक दिवशी तो टीव्ही पाहत असताना कॅलिफोर्नियाची एक बातमी पाहिली त्यामध्ये एक मुलगा वीर जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज लावून सलामी देत होता. ते पाहिल्यानंतर त्याने त्याच्या वडीलांशी बोलून हा अनोखा संकल्प केला. तो त्याचे वडील सतीश पराशरसोबत देशासाठी स्वातंत्र्यासाठी रोज सीमेवर वीरगती पत्करणाऱ्या आणि मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील वीरजवानांना त्यांच्या गावी जाऊन सलामी देण्याचे एक अनोखे कार्य करत आहे. वीर जवानांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन तिरंगा ध्वजासह कुटुंबीयांना सलामी देतो. नुकतेच त्यांनी मुंबईतील 26/11 मधील वीर तुकाराम ओंबळे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आणि आपली अनोखी सलामी देत आपला प्रवास सुरू ठेवला आहे. आत्तापर्यंत 1 हजार 565 वीर जवानांना देव आणि त्याच्या वडिलांनी त्यांच्या गावी जाऊन सलामी दिली असून यात राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक गावांचा समावेश आहे.

हेही वाचा - सरकारी कार्यलातून प्लास्टिक बॉटल होणार हद्दपार, मंत्रालयापासून सुरुवात

देशातील वीर जवानांच्या गावी जाऊन सलामी देण्याचा देव याचा प्रवास 2 जून, 2018 रोजी उत्तर प्रदेशातून सुरू झाला. आज त्याने दीड हजारांहून अधिक वीर जवानांना सलामी देण्याचा पल्ला गाठला आहे. देशभर फिरण्याचा मानस व्यक्त करत असून 11 हजार हुतात्म्यांच्या घरी पोहोचण्याचे लक्ष असल्याचे पराशरने सांगितले. उत्तर प्रदेशातील थंडीमुळे येथील शाळांना सुट्टी असून त्यामुळे आम्ही महाराष्ट्र आणि त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी काही दिवस फिरणार असल्याचेही देव यांच्या वडिलांनी सांगितले. रविवार, शनिवार हे सुट्टीचे दिवस आम्ही यासाठी निवडतो. दोन दिवसात ज्या ठिकाणी जाऊन येणे शक्य होईल, अशा राज्यांमध्ये आम्ही सर्व माहिती काढून जाऊन त्या शहीदांना सलामी देतो, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले.

हेही वाचा - भाजपाला सावरकरांचा आलेला कळवळा ही राजकीय कावेबाजी - सचिन सावंत

Intro:चिमुकल्या देव पराशरची आतापर्यंत दिली दीड हजाराहून अधिक शहिदांना सलामी

mh-mum-01-devprashar-child-miltryman- visu-byte- 7201153

मुंबई, ता. ३ :
देशासाठी विविध भागात शहीद झालेल्या तब्बल दीड हजाराहून अधिक शहिदांना त्यांच्या गावी जाऊन सलामी देण्याचा एक नवा विक्रम उत्तर प्रदेशातील आग्रा जवळच्या खंडोली गावातील देव पराशर या पाचवी शिकलेल्या चिमुकल्यांनी केला आहे. देशातील शब्दांच्या गावी जाऊन त्यांना सलामी देण्यासाठी खास सैनिकांचा वेश परिधान केला असून त्यावरचा तो देशभर फिरत असतो.

देव पराशर हा ईयत्ता पाचवीत शिक्षण घेतोय. परंतु त्याला आपल्या वडिल सतीश पराशर सोबत देशासाठी स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते रोज बोर्डरवर शहीद होणाऱ्या आणि मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना त्याच्या गावी जाऊन सलामी देण्याचे व्यसन जडलय. शहिदांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अभिवादन करतात, त्यासाठी ची ओळख म्हणून ते भारतीय तिरंगा असलेला ध्वज घेऊन कुटुंबियांना सलामी करताहेत. नुकतेच त्यांनी मुंबईतील 26/11 मधील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या घरी जाऊन ही आपली अनोखी सलामी देत आपला प्रवास सुरू ठेवला आहे. आत्तापर्यंत 1 हजार 565 शहिदांना देवआणि त्याच्या वडिलांनी त्याच्या गावी जाऊन सलामी दिली असून यात राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक गावांचा समावेश आहे.
देशातील शहिदांच्या गावी जाऊन सलामी देण्याचा देव याचा प्रवास प २ जून २०१८ रोजी उत्तर प्रदेशातून सुरू झाला. आज त्यांनी दीड हजाराहून अधिक शहिदांना सलामी देण्याचा पल्ला गाठला आहे. देशभर फिरण्याचा मानस व्यक्त करत असून 11 हजार शहिदांच्याच्या घरी पोचण्याची आमचे लक्ष आहे. उत्तर प्रदेशातील थंडीमुळे येथील शाळांना सुट्टी असून त्यामुळे आम्ही महाराष्ट्र आणि त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी काही दिवस फिरणार असल्याचेही देव यांच्या वडिलांनी सांगितलं. रविवार, शनिवार हे सुट्टीचे दिवस आम्ही यासाठी निवडतो. दोन दिवसात ज्या ठिकाणी जाऊन येणे शक्य होईल, अशा राज्यांमध्ये आम्ही सर्व माहिती काढून जाऊन त्या शहीदांना सलामी देतो असे त्यांच्या वडिलांनी सांगितले.
Body:mh-mum-01-devprashar-child-miltryman- visu-byte- 7201153Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.