मुंबई - पीएमसी बँक खातेधारकांनी मुंबईत आरबीआय बँकेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत भरपावसात आंदोलन केले. यावेळी बँकेच्या ग्राहकांनी आरबीआय समोर रास्तारोकोही केला. तसेच आरोपींवर मोठी कारवाई करा आणि आमचे पैसे लवकर परत करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - कमलेश तिवारी हत्येप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून २ मौलानांवर एफआयआर
आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक बंधने लादल्यानंतर बॅंकेच्या खातेधारकांनी तीव्र संताप व्यक्त करत आज (शनिवारी) आरबीआय जवळ आंदोलन केले. तसेच सर्वत्र आंदोलने, मूक मोर्चा अशा विविधमार्गांनी खातेधारक आपला संताप व्यक्त करत आहेत. बँक खातेधारकांनी आरबीआय समोर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी निर्बंध असल्यामुळे खातेधारकांना ताब्यात घेतले व आझाद मैदान येथे आंदोलनकर्त्यांना नेण्यात आले.
हेही वाचा - या लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारी मुंड्या चित केले; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर
खातेदार यांचे म्हणणे आहे, आरबीआयने लवकरात लवकर खातेधारकांना मदत करावी आणि खातेधारकांना पैसे मिळवून द्यावे. खातेधारक मोठ्या संकटात आहेत. त्यांच्याजवळ पैसे नसल्यामुळे उपचार, लग्नकार्य, शिक्षण तसेच सर्वच कामे पैशा अभावी रखडल्या आहेत. त्यामुळे अनेक खातेदारांना मानसिक धक्का बसला आहे. एक एक करून लोकांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे आरबीआयने व सरकारने यात लवकरच लक्ष घालून त्यांना त्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.