ETV Bharat / state

पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित - कर्मचारी संघटना समन्वय समिती

महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका कामगारांनी आंदोलन केले. कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत काही मागण्या मान्य केल्या. काही मागण्या चर्चेतून सोडवण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
author img

By

Published : Aug 28, 2019, 8:49 PM IST

मुंबई - महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका कामगारांनी आंदोलन केले. कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत काही मागण्या मान्य केल्या. काही मागण्या चर्चेतून सोडवण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
आगामी दोन महिन्यांत दिलेल्या आश्वासनांवर कार्यवाही झाली नाही तर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा अॅड. प्रकाश देवदास यांनी दिला आहे.बायोमेट्रिक हजेरीमुळे मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा पगार कापला जात आहे. त्यामुळे या प्रणालीमधील त्रुटी नोव्हेंबर महिन्यापूर्वी दूर कराव्यात. तो पर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करू नये. सामुदायिक गटविमा योजना १ ऑगस्ट २०१७ पासून बंद आहे. ही योजना बंद असल्याने कर्मचाऱ्यांना खिशातून खर्च करून रुग्णालयातून उपचार घ्यावे लागतात. कामगारांना गटविमा योजना लागू करावी.सातव्या वेतन आयोगाप्रमाणे २० टक्के थकबाकीचा दुसरा हप्ता गणपती सणापूर्वी देण्यात यावा. सहाव्या वेतन आयोगाच्या करारामधील त्रुटी दूर करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या रामनाथ झा समितीला वेळ मिळत नसल्याने नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कामगारांचे प्रश्न सोडवण्यात यावेत, अशा मागण्या कामगार समन्वय समितीने केल्या होत्या. कामगारांच्या आंदोलनाला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत काही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Intro:मुंबई - मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्या चर्चेतून सोडवू असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलन स्थगित केले असले तरी दोन महिन्यात मागण्यांबाबत कार्यवाही झाली नाही तर मात्र नोव्हेंबर महिन्यात पुढील भूमिका ठरवू असा इशारा ऍड. प्रकाश देवदास यांनी दिला आहे. Body:बायोमेट्रिक हजेरीमुळे मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा पगार कापला जात आहे. त्यामुळे या प्रणालीमधील त्रुटी नोव्हेंबरपूर्वी दूर कराव्यात. तो पर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये. सामुदायिक गटविमा योजना १ ऑगस्ट २०१७ पासून बंद आहे. योजना बंद असल्याने कर्मचाऱ्यांना खिशातून खर्च करून रुग्णालयातून उपचार करावा लागत आहे. अशा कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेल्या दोन लाख रुपयापर्यंतच्या दाव्याबाबतच्या फायली १५ दिवसात मार्गी लावाव्यात. कामगारांना गटविमा लागू करावा. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे २० टक्के थकबाकीचा एक हफ्ता फेब्रुवारीमध्ये देण्यात आला होता. त्यानंतर दुसरा हफ्ता अद्याप देण्यात आला नव्हता. हा दुसरा हफ्ता गणपती सणापूर्वी देण्यात यावा. सहाव्या वेतन आयोगाच्या करारामधील त्रुटी दूर करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या रामनाथ झा कमिटीला वेळ मिळत नसल्याने नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कामगारांचे प्रश्न सोडवण्यात यावेत अशा मागण्या समन्वय समितीने केल्या होत्या. त्यासाठी आज आंदोलन करण्यात आले. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मान्य केल्याने आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दोन महिन्यात याबाबत पुढे कारवाई झाली नाही तर मात्र पुन्हा नोव्हेंबरपासून आंदोलन केले जाईल असे देवदास यांनी सांगितले.

ऍड. प्रकाश देवसाद यांचा बाईट Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.