ETV Bharat / state

Sadiccha Sane Missing Case Reopen: बेपत्ता सदिच्छा सानेची फाईल पुन्हा उघडणार? श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क - मुंबई पोलीस

डॉक्टरकीचे शिक्षण घेणारी सदिच्छा साने (Sadiccha Sane Missing Case) मागील १२ महिन्यांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यात अजूनही मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आलेले नाही. त्यातच वसईतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने (Shraddha Walker Murder Case) दिल्लीसह मुंबई हादरून गेलेली असताना मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखा सदिच्छाचा शोध (Sadiccha Sane Search Mission) घेत आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस पुन्हा बेपत्ता सदिच्छा मनीष साने हिचा शोध घेण्याची Sadiccha Sane Missing Case Reopen शक्यता आहे.Latest news from Mumbai, Mumbai Crime

Sadiccha Sane Missing Case Reopen
सदिच्छा साने
author img

By

Published : Nov 23, 2022, 3:54 PM IST

मुंबई : डॉक्टरकीचे शिक्षण घेणारी सदिच्छा साने (Sadiccha Sane Missing Case) मागील १२ महिन्यांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यात अजूनही मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आलेले नाही. त्यातच वसईतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने (Shraddha Walker Murder Case) दिल्लीसह मुंबई हादरून गेलेली असताना मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखा सदिच्छाचा शोध (Sadiccha Sane Search Mission) घेत आहेत. मात्र, अद्याप सदिच्छाचा काहीच थांगपत्ता लागला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सदिच्छाचे कुटुंबीय अजूनही तिचा शोध लागेल Sadiccha Sane Missing Case Reopen अशी आस लावून आहेत. श्रद्धा हत्याकांडाच्या तपासाचे धागेदोरे वसई ते थेट दिल्ली असे गुंतले गेले आहेत. Latest news from Mumbai, Mumbai Crime

परीक्षा देण्यासाठी निघाली; पण घरी परतली नाही - मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून देखील सदिच्छाचा शोध लागला नाही आहे. त्यामुळे श्रद्धा वालकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस पुन्हा बेपत्ता सदिच्छा मनीष साने हिचा शोध घेण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, याचा तपास गुन्हे शाखेकडे असून ते याबाबत निर्णय घेतील. सदिच्छा ही MBBS शिकणारी तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत आली असता एकाएकी बेपत्ता झाल्याने गेल्या वर्षी खळबळ उडाली होती. सदिच्छा साने ही 22 वर्षीय तरुणी बोईसरमधील खोदाराम बाग येथे राहत होती असून मुंबईतील जे जे कॉलेजला प्रिलीयम परीक्षेसाठी जाण्यास ती 29 नोव्हेंबर रोजी घरातून सकाळी 10 वाजेच्या सुमारास निघाली होती. संध्याकाळ होऊनही सदिच्छा घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांकडून तिची शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र, दुपारच्या दोन वाजता सुरू होणाऱ्या प्रिलीयमच्या पेपरलाही सदिच्छा पोहचली नसून तिचा अचानक फोन बंद येत असल्याची माहिती कुटुंबीयांना तिच्या मैत्रिणींकडून देण्यात आली होती.

सदिच्छाच्या अपहरणाचा संशय - त्यानंतर साने कुटुंबाच्या पायाखालील जमीन सरकली आणि त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. शाळेच्या शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सदिच्छा नेहमीच टॉपर राहिली असून तिला मिळणाऱ्या स्कॉलरशिप आणि बक्षीस यांच्यातच तिच्या शिक्षणाचा खर्च भागत असून सदिच्छा नेहमीच कुटुंबाचा आधार राहिली. मात्र, कुटुंबाचा आधारच मागील १२ महिन्यांपासून बेपत्ता असल्याने साने कुटुंबीय चिंतेत आले आहेत. सदिच्छाचे शेवटचे मोबाईल लोकेशन हे बांद्रा बँडस्टँड येथे दाखवत असून तिचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत होती. सदिच्छाचे शेवटचे लोकेशन हे बँडस्टँड येथील असून एका लाईफ गार्डचा सेल्फी सदिच्छासोबत दिसून आला. मात्र, त्यानंतर सदिच्छा कुठे गेली याचा शोध अजूनही पोलिसांना घेता आलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.