ETV Bharat / state

Actress Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीची उच्च न्यायालयात धाव; ड्रग्स प्रकरणात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका

author img

By

Published : Dec 15, 2022, 9:21 AM IST

Updated : Dec 15, 2022, 9:44 AM IST

2016 मध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने ( Anti Narcotics Squad ) कोट्यवधी रुपयाचा ड्रग्स पकडला होता. प्रमुख आरोपी म्हणून अभिनेत्री ममता कुलकर्णी ( Actress Mamta Kulkarni ) यांच्यावर गुन्हा दाखल ( case registered as main accused ) केला होता. मात्र कागदपत्र गाळ झाल्याने सुनावणी होऊ शकली नसल्याने न्यायालयाने ठाणे पोलिसांवर नाराजी व्यक्त ( Expressed displeasure with Thane police ) केली.

Actress Mamta Kulkarni
अभिनेत्री ममता कुलकर्णीची उच्च न्यायालयात धाव

मुंबई : ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ( Anti Narcotics Squad ) 2016 मध्ये कोट्यवधी रुपयाचा ड्रग्स पकडला होता. या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी ( Actress Mamta Kulkarni ) प्रमुख आरोपी म्हणून गुन्हा दाखल ( case registered as main accused ) केला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा याकरिता ममता कुलकर्णीने उच्च न्यायालयात धाव ( Mamta Kulkarni approached the High Court ) घेतली आहे. मात्र कागदपत्र गाळ झाल्याने सुनावणी होऊ शकली नसल्याने न्यायालयाने ठाणे पोलिसांवर नाराजी व्यक्त ( Expressed displeasure with Thane police ) करत पुढील सुनावणी पर्यंत नवीन कागदपत्र तयार करून आणण्याचे निर्देश न्यायालयाने निबंधक कार्यालयाला दिले आहे.

20 टन इफेड्रीन ड्रग्ज जप्त : ठाणे पोलिसांनी 28 एप्रिल रोजी सोलापूरमध्ये छापा टाकून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे विविध प्रकारचे 20 टन इफेड्रीन ड्रग्ज जप्त केले होते. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणातील सहआरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी स्वतला दूर केले होते. ही बाब प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायमूर्ती डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ममता हिच्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून स्वतला दूर ठेवत असल्याचे स्पष्ट केले. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ममतासह अन्य आरोपींविरोधात ठाणे येथील पोलिसांनी 2016 मध्ये गुन्हा दाखल केला होता.

याचिका तिसऱ्यांदा सुनावणीसाठी आली : हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी ममताने वकील माधव थोरात यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका तिसऱ्यांदा सुनावणीसाठी आली. त्या वेळी ममता हिने दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित कागदपत्रे अद्यापही सापडलेली नसून त्याचा शोध सुरू असल्याचे न्यायालयाच्या निबंधक कार्यालयातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

काय आहे प्रकरण : ठाणे पोलिसांनी 28 एप्रिल रोजी सोलापूरमध्ये छापा टाकून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे विविध प्रकारचे 20 टन इफेड्रीन ड्रग्ज जप्त केले होते. यावेळी 10 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलं होतं. याप्रकरणात ममता वारंवार कोर्टात हजर राहिली नव्हती. त्यामुळे एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी ममताचे मुंबईतील तीन फ्लॅट जप्त करण्याचे आदेश दिले होते. ममताच्या या तिन्ही अलिशान फ्लॅट्सची किंमत 20 कोटी एवढी आहे.

इफेड्रीन ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड : तब्बल 2200 कोटी रुपयांच्या इफेड्रीन ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड ठाणे गुन्हे शाखेने 2016 मध्ये केला होता. ड्रग्जचा साठा पोलिसांनी सोलापूरच्या एव्हॅान लाइफ सायन्सेस कंपनीतून जप्त केला होता. याप्रकरणी अनेक आरोपींना जेरबंद केले होते. या ड्रग्ज तस्करीत विकी गोस्वामी आणि त्याची पत्नी ममता कुलकर्णी आरोपी असून दोघेही कॅनडात असल्याचं सूत्रांनी सांगितले. न्यायालयात उपस्थित राहण्याची मुदत देऊनही दोघेही हजर झाले नाहीत. त्यामुळे या दोघांना फरार घोषित करण्यात आलं होते. त्यानंतर विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी ममताची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने तिची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुढची कारवाई होणार आहे. ममता हिचे मुंबईतील अंधेरी भागात तीन फ्लॅटअसून त्यावर जप्ती करण्यात आली होती.

Last Updated : Dec 15, 2022, 9:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.