ETV Bharat / state

पोर्नोग्राफी प्रकरण : आरोपींमध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठचेही नाव - मुंबई पोलीस - mumbai police on gehana vashisth is accused

गहनाला पोलीस स्टेशनमध्ये रविवारी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ती हजर झाली नव्हती. मुंबईच्या बाहेर असल्यामुळे हजर होण्यास उशीर लागत असल्याचे तिने म्हटले होते. सोमवारी गहनाने यावर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे.

Actress Gehana Vashisth
अभिनेत्री गहना वशिष्ठ
author img

By

Published : Jul 28, 2021, 7:36 AM IST

Updated : Jul 29, 2021, 6:32 AM IST

मुंबई - उद्योगपती राज कुंद्राच्या कंपनीच्या तीन-चार निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक नाव अभिनेत्री गहना वशिष्ट हिचे देखील आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपासादरम्यान, आता आरोपींमध्ये गहनाचे नाव समोर आले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पोर्नोग्राफी प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे.

tweet
यासंबंधीचे ट्विट

समन्स मिळाल्यानंतर वैतागली गहना -

अश्लिल चित्रपट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला समन्स बजावले आहे. क्राईम ब्रँचने समन्स बजावल्यानंतर गहनाने सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून वारंवार होत असलेल्या चौकशीच्या फेऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गहना म्हणते मी म्हणजे काही चालता बोलता कंप्युटर नाही.

गहनाला पोलीस स्टेशनमध्ये रविवारी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ती हजर झाली नव्हती. मुंबईच्या बाहेर असल्यामुळे हजर होण्यास उशीर लागत असल्याचे तिने म्हटले होते. सोमवारी गहनाने यावर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटले, पहिल्यांदा मी 14 दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये होते. त्यानंतर आठ दिवस मालवणी पोलिसांसोबत होते. सीआयडी, डीसीबी टीमने माझे तिनही फोन, लॅपटॉप, सर्व अकाऊंट्स, पासवर्ड घेतले. मला माहिती असलेली सर्व गोष्टी मी त्यांना सांगितल्या. त्याला आता सहा महिने झाले. माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम फॉरेन्सीक टीम आहे. मग अजून काय विचारायचे राहिलंय.

ज्यांचे नंबर हवे तेही मी दिले आहेत. जर मी चुकीची असते तर माझे तोंड मी बंद ठेवले असते, जो माझा अधिकार आहे. तरीही मी सहकार्य केले.

पाच महिने तुरुंगात घालविल्यानंतर मला त्याच खटल्यात जामीन मिळाला. यानंतरही मी सीआयडी डीसीबी कार्यालयात गेले. त्यानी माझी सुमारे 4 तास चौकशी केली. ते आता मला का कॉल करीत आहेत? माझ्या शरीरात चिप तर लागलेली नाही. किंवा मी चालता बोलता कंप्यटर तर नाही. किंवा मी पैसे खाण्याचे मशीन तर नाही जे मी एका बाजूला खाते आणि दुसर्‍या बाजूने बाहेर येते. तुम्हा लोकांकडे सर्व काही आहे, आता काय हवंय..?''

गहना वशिष्ठची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली आहे. राज कुंद्रा अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात अडकल्यापासून गहना नेमी त्याची पाठराखण करीत असते. कुंद्रा हा पॉर्न फिल्म बनवीत नव्हता तर इरॉटिक सिनेमा बनावयचा असा युक्तीवाद केला जात आहे.

दरम्यान, पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रा याच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

Last Updated : Jul 29, 2021, 6:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.