मुंबई : Actress Nushrratt Bharuccha : पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलमध्ये घमासान युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. त्यामुळे नुसरतचे चाहते खूपच चिंतेत पडले होते. आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नुसरत सुखरुप भारतात परतली आहे. नुसरत दुबई मार्गाने मुंबई विमानतळावर दाखल झाली आहे.
दुतवासाच्या मदतीनं नुसरत मुंबईत दाखल : नुसरत हाइफा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेली होती. पण, युद्ध सुरु झाल्यानं नुसरत तिथेच अडकली होती. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तिच्यासोबत शेवटचा संपर्क झाला होता. त्याठिकाणी ती एका बेसमेंटमध्ये असून सुरक्षित असल्याचे कळाले होते. त्यानंतर तिच्यासोबत संपर्क होऊ शकला नव्हता. त्यामुळं तिचे कुटुंबिय आणि चाहते देखील अस्वस्थ झाले होते. आज दुतवासाच्या मदतीनं नुसरत दुबईमार्गे इस्रायलमधून भारतात आली आहे. रविवारी दुपारी नुसरत मुंबई विमानतळावर दाखल झाली.
हमासच्या हल्ल्यात अडकली होती 'अकेली ': अभिनेत्री नुसरत भरुचा ही हमासनं हल्ला केल्यानंतर इस्राईलमध्येच अडकली होती. तेथून नुसरतला सुरक्षित बाहेर काढून भारतात परत आणलं आहे. दरम्यान, नुसरत भरुचानं 'अकेली' या चित्रपटात इराकी युद्धात अडकलेल्या तरुणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात कुटुंबाचं कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतलेली मुलगी नोकरीसाठी इराकला जाते. त्यानंतर ती इराकमध्ये दहशतवादी संघटना आणि इराकी सैन्यात सुरू असलेल्या युद्धात अडकून पडते. त्यानंतर तिच्या सुटकेचा थरार या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचानं साकारलाय. मात्र, इस्राईलमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेलेली नुसरत ही योगायोगानं हमासनं केलेल्या हल्ल्यात अडकली होती. त्यामुळं चित्रपट कथेतील रिल लाईफ आणि नुसरत भरुचानं अनुभवलेली सत्यकथा हा योगायोगचं म्हणावा लागेल.
दुबईमार्गे परतली मुंबईत : शनिवारी दुपारी अभिनेत्री नुसरत भरुचासोबत संपर्क झाला होता. मात्र, त्यानंतर नुसरतसोबत संपर्क झाला नाही. रात्री उशिरादेखील आम्ही नुसरत भरुचासोबत संपर्कात होतो, त्यानंतर पुन्हा एकदा नुसरत भरुचासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, असं चित्रपट निर्माता निनाद वैद्य यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना स्पष्ट केलं होतं. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा नुसरत ही विमानतळावर पोहोचली होती. मात्र, एअर इंडियाचं विमान हमासच्या हल्ल्यामुळं रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळं नुसरत तिथंच अडकली होती, असंही निनाद वैद्य यांनी यावेळी स्पष्ट केलं. अखेर रविवारी ती मुंबई विमानतळावर पोहचली आहे.
हेही वाचा -
Gaza ISrael Conflict : हमास हल्ल्यात अडकली 'अकेली'; नुसरत भरूचानं अनुभवला जीवघेणा थरार अन् मग . . .
Israel Hamas Conflict : हमासच्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलचं प्रत्युत्तर, 230 हून अधिक पॅलेस्टिनी ठार
Israel Palestine War : इस्रायल-गाझा दरम्यानच्या मोठ्या सैनिकी कारवाया, जाणून घ्या सविस्तर