ETV Bharat / state

विना मास्क लोकलमधून प्रवास करणाऱ्या 5 हजार प्रवाशांवर कारवाई - Unmasked passengers fined mumbai

सर्वसामान्य प्रवाशांना 1 फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लोकल प्रवासादरम्यान अनेक प्रवासी विना मास्क लोकल प्रवास करतात. त्यामुळे, अशा प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे.

local
लोकल
author img

By

Published : Feb 17, 2021, 3:48 PM IST

मुंबई - सर्वसामान्य प्रवाशांना 1 फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लोकल प्रवासादरम्यान अनेक प्रवासी विना मास्क लोकल प्रवास करतात. त्यामुळे, अशा प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. मागील 14 दिवसांत एकूण 4 हजार 618 प्रवाशांवर कारवाई करून 4 लाख 50 हजार 100 रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.

माहिती देताना मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार

हेही वाचा - स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्याना शासकीय सेवेत सामावून घेणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

साडेचार हजार प्रवाशांवर कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. लोकल प्रवाशांना नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, काही प्रवासी विना मास्क प्रवास करत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. विना मास्क प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार मध्य मार्गावर गेल्या 14 दिवसांत 2 हजार 60 प्रवाशांवर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 2 हजार 558 प्रवाशांवर कारवाई करून 4 लाख 50 हजार 100 रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची कमी

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी महापालिकेने कर्मचारी तैनात केले आहेत. एकूण क्लिनिक मार्शल आणि पालिका कर्मचारी यांचे 500 पेक्षा जास्त पथक रेल्वे स्थानक परिसरात तैनात आहेत. मात्र, कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने काही प्रवासी दंड न भरता बिनधास्त प्रवास करत आहेत. तर, काही प्रवासी दंड भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचे स्वरूप नंतर भांडणात होते, त्यामुळे अखेर स्थानकावरील रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी येऊन कारवाई करत आहेत.

40 लाख प्रवासी करतात प्रवास

राज्य सरकारच्या निर्देशानुसार ठराविक वेळेत लोकल प्रवास सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला केला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वे मार्ग, मध्य रेल्वे मार्गावरील मुख्य मार्गिकेवर 100 टक्के क्षमतेने आणि इतर मार्गांवर 95 टक्के क्षमतेने लोकल धावत आहेत. त्यामुळे, प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरून सुमारे 20 ते 22 लाख प्रवासी तर, पश्चिम रेल्वे मार्गावरून सुमारे दररोज 18 ते 20 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. या दोन्ही मार्गावर दररोज 40 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा - पूजा प्रकरण : चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल; दादा भूसे यांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.