मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणाला या प्रकरणात तपास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्यानंतर या प्रकरणात चौकशी सुरू झाली होती त्यानंतर अमरावतीतून या 11 ही आरोपींना अटक करण्यात आले होते. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. अमरावतीतील उमेश कोल्हे हे व्यवसायाने मेडिकल दुकानदार होते. एनआयएने या प्रकरणाला दहशतवादी संघटनेची संबंधित असल्याचे कोर्टात केलेल्या युक्तिवादा दरम्यान म्हटले होते.
आरोपी - एनआयए कडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण? - नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली.
हत्येचा तपास एनआयएकडे - प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.