ETV Bharat / state

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, आरोपी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर संबंधित साक्षीदार फितूर - Witness Fitoor regarding Sadhvi Pragya Singh

मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील ( Malegaon Bomb Blast )28 साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात (Special NIA Court ) फितूर म्हणून घोषित केला आहे. या प्रकरणातील आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ( MP Sadhvi Pragya Singh Thakur ) आणि आरोपी सुधाकर उदयभान धर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे उर्फ शंकराचार्य यांच्या संबंधित साक्षीदार क्रमांक 281 फितूर म्हणून न्यायालयाने घोषित केला आहे. आता या प्रकरणात 106 साक्षीदारांची जबाब अद्याप नोंदणी बाकी आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 4, 2022, 3:07 PM IST

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील ( Malegaon Bomb Blast )28 साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात (Special NIA Court ) फितूर म्हणून घोषित केला आहे. या प्रकरणातील आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ( MP Sadhvi Pragya Singh Thakur ) आणि आरोपी सुधाकर उदयभान धर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे उर्फ शंकराचार्य यांच्या संबंधित साक्षीदार क्रमांक 281 फितूर म्हणून न्यायालयाने घोषित केला आहे. आता या प्रकरणात 106 साक्षीदारांची जबाब अद्याप नोंदणी बाकी आहे.

न्यायलयाने फितूर म्हणून घोषित केले - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि आरोपी क्रमांक 10 सुधाकर उदयभान धर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे उर्फ शंकराचार्य त्यांच्या संदर्भातील विशेष एनए कोर्टामध्ये साक्षदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता. एटीएसने या संबंधित साक्षीदाराचा जबाब नोंदवला होता. साक्षीदाराने कुठल्याही प्रकारचा जबाब दिलेला नाही. तसेच स्वाक्षरी देखील केलेली नाही आहे. तसेच प्रज्ञा सिंग ठाकूर यांना ओळखण्यापासून देखील नकार दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात 28 साक्षीदार फितूर म्हणून घोषित केले आहेत.

या आधी साक्षादाराने दिला होता जवाब - मुंबई एटीएस आणि नागपूर एटीएसने साक्षीदार क्रमांक 261 चा जबाब नोंदवण्यात आला होता. या जबाब त्यावेळी साक्षीदाराने असे म्हटले होते, की साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि शंकराचार्य हे उज्जैनमधील मंदिरात राहिले होते, असा जबाब एटीएसला देण्यात आला होता. मात्र, आज न्यायालयासमोर जवाब नोंदवताना, अनेक वर्ष उलटून गेल्याने मला काही आठवत नसल्याचे साक्षीदाराने म्हटले आहे. साक्षीदार हा उज्जैनमधील मंदिरातील ट्रस्टी आहे. नंतर न्यायालयाने साक्षीदाराला फितूर म्हणून घोषित केले आहे.

आतापर्यंत 28 जणांनी साक्ष बदलली - देशात हिंदू दहशतंवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणापासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 28 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती.

काय आहे प्रकरण - 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.