मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी 'वंदे मातरम'बद्दल केलेल्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे बुधवारी महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. औरंगाबादमधील दंगलीचा उल्लेख करुन आझमी म्हणाले की, 'वंदे मातरम'चा आपण आदर करतो मात्र त्याची घोषणा करणे आपल्याला मान्य नाही. ते म्हणाले, 'काही लोक म्हणतात की तुम्हाला भारतात राहायचे असेल तर तुम्हाला वंदे मातरम म्हणावेच लागेल. आम्ही ते करू शकत नाही, कारण आमच्या धर्माला ते मान्य नाही. आम्ही फक्त आल्लाच्यापुढे नतमस्तक होतो.
कुणापुढेही डोके टेकवू शकत नाही - सदनातून बाहेर आल्यानंतर अबू आझमी माध्यमांशी बोलत होते, ते म्हणाले की, जेव्हाही सदनामध्ये वंदे मातरम् गायले जाते, तेव्हा मी उभा राहून त्याचा आदर करतो. पण मी ते म्हणू शकत नाही. कारण माझ्या धर्मात असे म्हटले आहे की, ज्या अल्लाहने जमीन निर्माण केली, त्यानेच आकाश, सूर्य घडवले, चंद्र घडवले, माणूस घडवले आणि सारे जग घडवले. त्याच्या शिवाय आपण कुणापुढेही डोके टेकवू शकत नाही, असे माझ्या धर्मात म्हटले आहे. मी तुमचा अपमान करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार दिला आहे, असे ते म्हणाले.
-
हम वो है जिनके पूर्वजों ने इस देश के लिए अपनी जान दी, हम वो है जिन्होंने पाकिस्तान को नहीं भारत को अपना मुल्क माना। हमें इस्लाम सिखाता है की सर उसी के आगे झुकाओ जिसने ये सारा जहान बनाया। मेरे मज़हब के मुताबिक अगर मैं वंदे मातरम नहीं बोल सकता हूँ तो इस से मेरे दिल में मेरे मुल्क… pic.twitter.com/daMQOR8ZdH
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) July 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">हम वो है जिनके पूर्वजों ने इस देश के लिए अपनी जान दी, हम वो है जिन्होंने पाकिस्तान को नहीं भारत को अपना मुल्क माना। हमें इस्लाम सिखाता है की सर उसी के आगे झुकाओ जिसने ये सारा जहान बनाया। मेरे मज़हब के मुताबिक अगर मैं वंदे मातरम नहीं बोल सकता हूँ तो इस से मेरे दिल में मेरे मुल्क… pic.twitter.com/daMQOR8ZdH
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) July 19, 2023हम वो है जिनके पूर्वजों ने इस देश के लिए अपनी जान दी, हम वो है जिन्होंने पाकिस्तान को नहीं भारत को अपना मुल्क माना। हमें इस्लाम सिखाता है की सर उसी के आगे झुकाओ जिसने ये सारा जहान बनाया। मेरे मज़हब के मुताबिक अगर मैं वंदे मातरम नहीं बोल सकता हूँ तो इस से मेरे दिल में मेरे मुल्क… pic.twitter.com/daMQOR8ZdH
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) July 19, 2023
सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब - या अबू आझमी यांच्या विधानावर भाजप आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला आणि त्यानंतर सभागृहात गदारोळ सुरू झाला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले की, आझमी यांची टिप्पणी या विषयाशी अप्रासंगिक आहे. त्यांनी चर्चेसाठी सूचीबद्ध केलेल्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावे. नार्वेकर यांच्या आवाहनानंतरही गोंधळ सुरूच राहिला आणि त्यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
-
#WATCH | Maharashtra Samajwadi Party MLA Abu Azmi says, "I respect 'Vande Mantram' but I can't read it because my religion says we can't bow down to anyone except 'Allah'. pic.twitter.com/uYJmkR7GWj
— ANI (@ANI) July 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra Samajwadi Party MLA Abu Azmi says, "I respect 'Vande Mantram' but I can't read it because my religion says we can't bow down to anyone except 'Allah'. pic.twitter.com/uYJmkR7GWj
— ANI (@ANI) July 19, 2023#WATCH | Maharashtra Samajwadi Party MLA Abu Azmi says, "I respect 'Vande Mantram' but I can't read it because my religion says we can't bow down to anyone except 'Allah'. pic.twitter.com/uYJmkR7GWj
— ANI (@ANI) July 19, 2023
माझ्या देशाबद्दलचा आदर - यानंतर अबू आझमी यांनी ट्विट करून त्यांची भूमिका मांडली. आझमी ट्विटमध्ये म्हणाले की, आम्ही तेच आहोत ज्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी आपले प्राण दिले, आम्ही ते आहोत ज्यांनी भारताला आपला देश मानला, पाकिस्तान नाही. ज्याने हे संपूर्ण जग निर्माण केले त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला इस्लाम शिकवतो. माझ्या धर्मानुसार, जर मी वंदे मातरमचे पठण करू शकत नाही, तर त्यामुळे माझ्या देशाबद्दलचा आदर आणि देशभक्ती कमी होत नाही आणि त्यामुळे कोणाचाही आक्षेप होता कामा नये. तुम्ही या देशावर जितके प्रेम करता तितकेच आम्ही आहोत!