ETV Bharat / state

मोदींसाठी कायपण ! प्रचारासाठी कार्यकर्ता करतोय दुचाकीवरून भारतभ्रमण

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक कार्यकर्ता आहे. जो मोदींच्या प्रचारासाठी दुचाकीवर 'भारत भ्रमण' करत आहे. अभिषेक शर्मा असे या अवलियाचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्यांने १३ मार्चला नरेंद्र मोदींच्या प्रचाराला अलिगडमधून सुरूवात केली आहे.

प्रचारासाठी कार्यकर्ता करतोय दुचाकीवरून भारतभ्रमण
author img

By

Published : Apr 20, 2019, 7:06 PM IST

मुंबई - निवडणुकीत प्रचारासाठी अनोखे फंडे वापरले जातात. त्यातल्या त्यात सोशल मीडियाला आता विशेष महत्व आले आहे. मात्र, या माध्यमांचा बोलबाला असतानाही काही कार्यकर्ते वेशभूषा असो की आणखी काही वेगळ्या क्लुप्त्यांनी माध्यमांत चांगलेच 'भाव' खाऊन जातात. असाच एक पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यकर्ता आहे. जो मोदींच्या प्रचारासाठी दुचाकीवर 'भारत भ्रमण' करत आहे.

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्मा असे या अवलियाचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्यांने १३ मार्चला नरेंद्र मोदींच्या प्रचाराला अलिगडमधून सुरूवात केली. आता त्यांच्या भ्रमणाची यात्रा महाराष्ट्रात पोहचली आहे. हा अवलिया ६१ दिवसांत दुचाकीवरून भारतभ्रमणाचा प्रवास पूर्ण करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा विजय व्हावा, यासाठी आपण देशभर प्रचार करत आहे. दुचाकीवर जाताना ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना नरेंद्र मोदी यांना निवडून द्यावे, हेच आवाहन आपण करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

कोण आहेत अभिषेक शर्मा -
अभिषेक शर्मा हे व्यवसायाने पर्यावरणतज्ज्ञ आहेत. त्यांनी मोदींच्या प्रचारासाठी आपल्या कामाला तब्बल २ महिन्यांची सुट्टी घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत काश्मीर, जम्मू हिमाचल प्रदेश, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश या राज्यांचा दौरा पूर्ण केला आहे. आता ते महाराष्ट्रातून कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा दौरा करून ओरिसा मार्गे पुन्हा अलिगढला पोहचणार आहेत.

शर्मांची दुचाकीही 'हायटेक' -
अभिषेक शर्मा यांनी प्रचारासाठी भारत भ्रमणाचा निर्धार केला आहे. त्यासाठी ते सद्या प्रवासात आहे. रस्त्याची माहिती व्हावी, यासाठी त्यांनी आपल्या दुचाकीवर अत्याधुनिक जीपीएस प्रणाली बसवली आहे. तसेच आपल्या भारत भ्रमणाचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक कॅमेरेही आपल्या दुचाकीवर लावले आहेत.

Intro:अनोखा कार्यकर्ता , मोदींच्या प्रचारासाठी दुचाकीवर भारतभ्रमण

मुंबई

निवडणुकीत प्रचारासाठी अनोखे फंडे वापरले जातात ,त्यातल्या त्यात सोशल मीडियाला आता विशेष महत्व आले आहे . मात्र या माध्यमांचा बोलबाला असतानाही काही कार्यकर्ते भाव खाऊन जातात . उत्तरप्रदेशातला अभिषेक शर्मा पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी दुचाकीवर भारत भ्रमण करतोय . गेल्या १३ मार्चला अलिगढ येथून शर्मा यांनी आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली होती . आता त्यांची यात्रा महाराष्ट्रात पोहचली असून त्यांनी दक्षिणेकडे कूच केली आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०१९च्या निवडणुकीत पुन्हा विजय व्हावा यासाठी आपण देशभर प्रचार करत असल्याचे शर्मा यांनी सांगितले . दुचाकीवर जाताना ग्रामीण आणि शहरी भागात लोकांना हाच संदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवसायाने पर्यावरणतज्ञ् असलेले शर्मा यांनी दोन महिन्यांची सुट्टी घेतली आहे . आपल्या ६१ दिवसांच्या प्रवासात ते दुचाकीवरून भारतभ्रमण करणार आहेत . त्यांनी आतापर्यंत काश्मीर,जम्मू हिमाचल प्रदेश , राजस्थान दिल्ली मध्यप्रदेश या राज्यांचा दौरा केला असून आता ते महाराष्ट्रातून कर्नाटक ,तामिळनाडू आणि केरळचा दौरा करून ओरिसा मार्गे पुन्हा अलिगढला पोहचणार आहेत .
अत्याधुनिक दुचाकी वर त्यांनी जीपीएस सिस्टिम बसवली आहे .तसेच आपल्या भारत भ्रमणाचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक कॅमेरेही आपल्या दुचाकीवर लावले आहेत . Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.