ETV Bharat / state

AAP on Ajit Pawar Statement : अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजेंबाबत केलेल्या वक्तव्याशी आम आदमी पक्ष सहमत - Dhananjay Shinde

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत भाषण करत असताना, 'छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते', (Chhatrapati Sambhaji Raje) असं वक्तव्य केलं होतं. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर काही संघटनांनी त्यांच्यावर टीका देखील केली असली तरी,आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) यांनी अजित पवार यांना ट्विटच्या माध्यमातून पाठिंबा (AAP agrees with Ajit Pawar statement) दिला आहे.

AAP Agrees With Pawar Statement
वक्तव्याशी आम आदमी पक्ष सहमत
author img

By

Published : Dec 31, 2022, 3:24 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत भाषण करत असताना, 'छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते', (Chhatrapati Sambhaji Raje) असं वक्तव्य केलं होतं. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर काही संघटनांनी त्यांच्यावर टीका देखील केली असली तरी आम आदमी पक्षाने मात्र अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याशी आम आदमी पक्ष सहमत असल्याचं, ट्विटच्या माध्यमातून म्हणटलं आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी सर्व धर्मीयांचे रक्षण केलं. ते स्वराज्य रक्षक होते, असं आपल्या ट्विटच्या (AAP agrees with Ajit Pawar statement) माध्यमातून सांगितलं आहे. तर तेथेच अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर काही मराठा संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

Tweet by Dhananjay Shinde
धनंजय शिंदे यांचे ट्विट

तर तेथेच राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांनीही अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारावा यासाठी त्यांच्यावर मोगलांनी 40 दिवस धर्म परिवर्तनासाठी दबाव आणत, अत्याचार केले होते. तर संभाजीराजे यांनी देहाचं बलिदान केलं. मात्र धर्म बदलला नाही, अजित पवार यांना हे मान्य नाही का ? असा सवाल शंभूराजे देसाई यांनी उपस्थित केला आहे. महापुरुषाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाविकास आघाडीची नेते अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच निषेध नोंदवत होते. मग शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी विधानसभेत हे वक्तव्य का केले? 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण', असं म्हणत अजित पवार यांना शंभूराजे देसाई यांनी टोलाही लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर नागपूर येथे पार पडलेले, हे पहिलेच हिवाळी अधिवेशन होते. शेवटच्या दिवशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाने केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भाष्य केलं. तुम्ही जे बाहेर केलं ते आता विसरून जा, मुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णपणे राजकीय होतं, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली. यावेळी महापुरुषांच्या अवमानाविरोधातही अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचही हिंदवी स्वराज्य होतं, असे ते म्हणाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.