ETV Bharat / state

Chitranagari In Goregaon: गोरेगावमध्ये 521 एकर जागेवर अत्याधुनिक चित्रनगरी उभारणार -मुनगंटीवार - मुंबईतून बॉलीवूड दुसऱ्या राज्यात

मुंबईतून बॉलीवूड दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्याची ओरड सुरू असतानाच, राज्य सरकारने मुंबईत सुमारे 521 एकर जागेवर अत्याधुनिक चित्रनगरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरण्यासाठी राज्यातील 65 पर्यटन स्थळे 24 विधानसभा विकसित केल्या जाणार आहेत. याबद्दलची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Chitranagari In Goregaon
Chitranagari In Goregaon
author img

By

Published : Mar 30, 2023, 8:32 PM IST

मुंबई : राज्यातील उद्योगधंदे, व्यापाऱ्याबरोबरच बॉलीवूड इंडस्ट्री मुंबई आणि महाराष्ट्र बाहेर नेण्याचा डाव आखला आहे, असा विरोधकांचा आरोप होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील, मुंबईत येऊन यूपीमध्ये बॉलीवूड इंडस्ट्री उभी करण्याचे घोषणा केली होती. अनेक अभिनेत्यांकडून सल्लाही घेतला होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने त्याला शह देण्यासाठी मुंबईतील गोरेगाव येथे अत्याधुनिक चित्र नगरी उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. याच दरम्यान, राज्यातील अनेक उद्योगधंदे परराज्यात गेले. विरोधकांनी यावरून सरकारच्या कारभारावर टीका केली. मुंबई उभारली जाणारी चित्रनगरीही राज्यात जाईल, अशी भीती व्यक्त केली होती. आमदार विक्रम काळे यांनी देखील गोरेगाव मधील अत्याधुनिक चित्रनगरीचा प्रश्न उपस्थित केला आहे.

सरकारकडे पत्राद्वारे मागणी : तत्कालीन राज्य सरकारने मुंबईतील 521 एकर जागेवर अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली चित्रनगरी उभारण्याचा निर्णय घेतला होता. विमानतळा जवळ 104 चौरस मीटर पार्क आणि त्यासोबत चित्रपट चित्रीकरण्यासाठी राज्यात 65 ठिकाणी सर्व सोयी सुविधांसह पर्यटन स्थळे विकसित केली जाणार होती. राज्य सरकारने याबाबत खुलासा करायला हवा, अशी काळे यांनी सरकारकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

चित्रपटाशी संबंधित ज्ञान देणारे केंद्र : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत विचारले असता, मुंबईत गोरेगांव येथे साधारणत: 521 एकर जमीन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित या संस्थेला 1977 मध्ये चित्रपट निर्मितीकरिता देण्यात आली होती. या ठिकाणी आम्ही चार भागांमध्ये काम करण्याचा निर्णय केला आहे. जेवढे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक असतील त्यांच्याशी चर्चा करू. तसेच, जे जे अत्याधुनिक तंत्रज्ञान चित्रपटासाठी लागते, ते सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान तिथे उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. या संदर्भातील स्टुडिओ उपलब्ध करून देण्याबरोबरच चित्रपटाशी संबंधित ज्ञान देणारे केंद्र आणि त्या दृष्टीने सुद्धा एक सेक्टर करणार असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

65 पर्यटन स्थळांचा शोध : राज्यात 65 ठिकाणी पर्यटन स्थळ सोयी आणि सुविधांसह विकसित करण्याबाबत जागा निश्चिती अद्याप झालेली नाही. जागा शोधण्याचे काम सुरू आहे. चित्रपट चित्रीकरणासाठी आवश्यक बाबी तपासून जागांचा विकास केला जाईल. जेणेकरून, चित्रीकरण करताना चित्रपट निर्मिते, दिग्दर्शक यांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा : Udayanraje Bhosale Met Amit Shah : खासदार उदयनराजेंनी घेतली अमित शाह यांची भेट; 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.